21 C
New York

Pawar Vs Pawar : बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार?

Published:

बारामती

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Elections) महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा मतदार संघ बारामती ठरला. या निवडणुकीत पवार कुटुंबियामध्येच लढत झाली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यातील ही लढत मोठी रंगली होती. भावजय-नणंद यांच्या या लढतीत नणंद सुप्रिया सुळे यांनी अखेर बाजी मारली. (Sharad Pawar) दरम्यान, आता बारामती विधानसभेच्या (Baramati Assembly) निवडणुकीबद्दल मोठी चर्चा रंगली आहे. (Yugendra Pawar) तसंच, अनेक ठिकणी बॅनरवर विधानसभेत काका-पुतण्यात (Pawar Vs Pawar) लढत रंगणार असल्याचं चित्र दिसतय. तशी मागणीही कार्यकर्त्यांकडून होताना पाहायला मिळतय.

दादा’ बदलायचे आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्यात लढत होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आज शरद पवार बारामती दौऱ्यावर असून येथे कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांनाच उमेदवारी द्यावी अशी थेट मागणी शरद पवारांकडे केली आहे. तसंच, प्रत्येक मंगळवारी बैठका घेऊन युगेंद्र पवार कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवत आहेत. त्यामुळे सध्या मतदारसंघात त्यांच्याबद्दल एक लाट आहे. हे लक्षात घेऊन आपण युगेंद्र पवार यांनाच येत्या विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली आहे. तसंच, आम्हाला ‘दादा’ बदलायचे आहेत असं कार्यकर्ते म्हणताच एकच हशा पिकला.

पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार

लोकसभा निकालानंतर अजित पवार गट बारामतीमध्ये बॅकफूटवर गेला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य बारामती विधानसभेमधूनच सुप्रिया सुळे यांना मिळालं. त्यामुळे अजित पवार यांना आव्हान निर्माण झालं आहे का? अशीही चर्चा रंगली होती. तसंच, बारामतीमध्ये उमेदवार कोण असणार याचा अंतिम निर्णय हा शरद पवार यांचाच असणार आहे. मात्र, युगेंद्र पवार यांच्या समर्थकांकडून त्यांच्याच नावाचा आग्रह आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img