अनेकांच्या घरात पाल Lizards येण्याची मोठी समस्या असते. प्रत्येकाच्याच घरात पालींचा धुमाकूळ बघायला मिळतो. पालीला पाहून सर्वांचीच तारांबळ उडत असते. लहान असो की मोठा प्रत्येक जण पालीला अत्यंत घाबरतो. आपल्या घरात पाल येण्याचे बरीच कारणे असतात. पाली उरलेल्या किंवा गोड पदार्थांच्या वासाला आकर्षित होतात त्यामुळे घरात पालीचे प्रमाण वाढते व घरात पालीचे आगमन होते.
काही ज्यांना तर पालीचा किंवा कोणत्याही गोष्टीचा फोबिया (भीती ) काही जण तर पालीला पाहून जागेवरच उड्या मारू लागतात. घरात पाल येणे कोणालाही आवडत नाही. पण तरीही नको असलेल्या पाहुण्या सारखी पाल वारंवार घरी येत असते. अशात पाल पळविण्यासाठी काही घरगुती उपाय करावे. पाहू काही असेच सोपे उपाय
1. कांदा
कांद्याचा रस आणि काही लसनाच्या पाकळ्यांचा रस एकत्र करा. त्यात थोडं पाणी मिसळावं. हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरा. ज्या ठिकाणी पाल येते त्याठिकाणी हे मिश्रण शिंपडावं. त्यामुळे पाल आपोआप निघून जाईल.
चपाती किंवा भात तुमच्या आरोग्यासाठी काय आहे चांगले ?
2. लसूण
लसणाचा दर्पही पालींसाठी असह्य असतो. त्यामुळे लसणाचाही वापर तुम्ही करु शकता.
3. फ्लायपेपर
फ्लायपेपर तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाईन मिळतील. भिंतींना फ्लायपेपर चिटकवून ठेवा आणि पाली जर त्याला चिकटल्या तर तुमच्या तावडीत सापडल्या असे समजा.
4. अन्न झाकून ठेवावे
स्वयंपाकघरातील आणि घरातील उरलेले अन्न लगेच झाकून ठेवावे, जेणे करून अन्नाच्या शोधात पाळी घरात येणार नाहीत.
5. अंडीचे टरफल
पाली अंडीच्या वासापासून लांब राहतात. दारावर खिडक्यांवर अंडीचे टरफल ठेवून द्या. त्याच्या वासामुळे पाल घरात येणार नाही.