23.1 C
New York

Sanjay Raut : ‘मविआ’ विधानसभा निवडणूक एकत्र लढणार का? राऊत म्हणाले

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाले आहे. राज्यात महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकले आहे. तर महायुतीने 48 पैकी 17 जागेवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. राज्यात तीन महिन्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election) होणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार का असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारण्यात आला होता. यावर राऊत यांनी दिलेले उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष एकत्र निवडणूक लढणार की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाणार? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. तेव्हा विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवू. त्यासाठी स्थानिक स्तरावर संघटन मजबूत असणं गरजेचं आहे. त्याचबाबत आजच्या बैठकीत आम्ही चर्चा केली. एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू. पण तिथं संघटनात्मक बांधणी मजबूत झाली पाहिजे. त्यासाठी कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. 180-185 जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

भाजपला बहुमतापासून रोखण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाविकास आघाडीचा मोठा वाटा आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, मुंबईचे विभाग प्रमुख यांची बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यास सांगण्यात आलं आहे. तशी चर्चा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झाली, असं संजय राऊत म्हणाले.

भाजप रोखण्यात महावीकास आघाडीचे योगदान जास्त आहे. संघटनात्मक बांधणीवर आम्ही जोर दिला आहे. स्थानिक मतदारसंघातील निवडणुका आहेत त्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. 288 मतदारसंघाची बांधणी करण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. असं संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img