3.8 C
New York

Salman Khan : सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Published:

मुंबई

सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार (Salman Khan House Firing Case) प्रकरणातील आरोपी अनुज थापन (Anuj Thapan) याचा कोठडीतच मृत्यू झाला. अनुजने तुरुंगातच (Galaxy Apartment Firing Case) आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका देखील दाखल केली. या याचिकेमध्ये सलमान खानचं देखील नाव टाकण्यात आलं होतं. पण आता मुंबई उच्च न्यायालयाकडून सलमान खानला मोठा दिलासा देण्यात आलाय.

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अभिनेत्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील आरोपीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेतील प्रतिवादी म्हणून त्याचे सलमान खानचं नाव काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात अनुज थापन नावाच्या आरोपीने आत्महत्या केली होती. थापनच्या कुटुंबीयांनी सदर प्रकरणात सीबीआय चौकशीची मांगणी करत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका केली होती. घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या कोठडी मृत्यू प्रकरणाशी सलमानचा संबंध नसल्याचं हायकोर्टाकडून सांगण्यात आलंय. त्याचप्रमाणे अनुज थापनच्या आईनं दाखल केलेल्या याचिकेतून सलमानचं नाव वगळण्याचेही आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img