21 C
New York

Pune Rain : पुण्यात दोन दिवसात रेकॉर्डब्रेक पाऊस

Published:

पुणे शहरासह (Pune Rain) जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या 34 वर्षांतील सर्व विक्रम मोडले. पुण्यात दोन दिवसापासून पावसाने पुण्याला झोडपले आहे. मागील वर्षी रुसलेल्या पावसाची सुरुवात यंदा चांगली झाली आहे. गेल्या तीन, चार दिवस पुणे शहरात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाने पुणे शहरातील जून महिन्याची सरासरीही ओलांडली आहे. मागील नऊ दिवसांत 209 मिमीपावसाची नोंद झाली आहे. या पूर्वी जून 2019 मध्ये 74 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तर 8 जून 2024 लोहगावात 139.8 तर शिवाजीनगरात 117 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात इंदापूरमध्ये 110 मि.मी. पावसाची नोंद झाली.

संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. पहिल्यास पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं. पहिल्याच पावसात पुणे पूर्णपणे तुंबले होते. यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. मागच्या वर्षी शहरासह जिल्ह्यात नियोजित वेळेपेक्षा तब्बल 10 ते 15 दिवस उशीरा आला होता. दरवर्षी शहरात तो 9 ते 10 जून दरम्यान येतो. मागच्या वर्षी 25 जून रोजी शहरात दाखल झाला होता.

Pune Rain 24 तासांत जिल्ह्यात झालेला पाऊस

शिवाजीनगर : 119.1 मिमी
इंदापूर : 110 मिमी
वडगावशेरी : 92.5 मिमी
पाषाण 79.3 मिमी
एनडीए: 71.5 मिमी
तळेगाव ढमढेरे : 60 मिमी
हवेली : 54.5 मिमी
बारामती 51.20 मिमी
हडपसर 45 मिमी
मगरपट्टा : 43 मिमी
दौंड : 35.5 मिमी
चिंचवड : 25.5 मिमी
गिरीवन :21 मिमी
लोणावळा : 12 मिमी
तळेगाव : 11.58 मिमी
राजगुरुनगर : 11 मिमी

27 ओबीसी, 15 एसटी अन्… कसं आहे मोदींचं मंत्रिमंडळ?

Pune Rain अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष

पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांकडे केलेले दुर्लक्ष आणि महापालिकेने नैसर्गिक नाले बुजविण्याच्या केलेल्या पापामुळेच शनिवारच्या पावसात शहर पाण्याखाली गेले आहे, असा आरोप भाजपच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.

Pune Rain खडकवासला धरणात वाढ नाही

तीन दिवसांच्या पावसानंतर देखील खडकवासला धरण साखळी क्षेत्राच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात केवळ 4.21 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्राचा पाणीसाठा वाढवण्यासाठी 120 मिलिमीटर पावसाची गरज आहे.

Pune Rain पावसामुळे पुण्यात भाज्यांची आवक घटली

राज्यभर झालेल्या पावसामुळे पुण्यात भाज्यांची आवक घटली आहे. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक कमी तर मागणी जास्त आहे. त्यामुळे अनेक भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची, काकडी, शेवगा या भाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी झाली आहे. परंतु पुण्यातील बाजारात टोमॅटोचे भाव उतरले आहेत. फुलांना देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img