23.1 C
New York

Maratha Reservation : बार्शीत मराठा समाजाच्या वतीने रस्तारोको आंदोलन

Published:

सोलापूर

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणी करिता मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाला बसले आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने बार्शी तालुक्यात रस्तारोको आंदोलन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्य सरकारला मराठा समाजाचा फटका बसल्याचे निवडणुकीमधून दिसून आले आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणी करिता पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील समर्थनात आता राज्यात विविध ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका मराठा समाजाच्या वतीने आज रस्ता रोको करण्यात आला आहे. ओबीसी गोल्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन केले. बार्शीतील पोस्ट चौकामध्ये हे रस्त्या लोकांकडून करण्यात आले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले असल्याचे आंदोलन करते यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img