पुणे
पुणे पोर्शे कार अपघात (Pune Accident) प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal), आई शिवानी अग्रवालच्या (Shivani Agarwal) पोलिस कोठडीत (Police Custody) 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अश्पाक मकानदार यांना 14 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सरकारी वकील सुनील कुंभार म्हणाले, ज्या मुलाने कार चालवली त्याचे रुग्णालयात रक्त नमुने घेण्यात आले. त्याची कुठे विल्हेवाट लावली आहे त्याबाबत तपास करणे आहे. मकानदर यास जो मोबदला मिळाला त्याबाबत चौकशी करणे आहे. शिवानी अगरवाल यांनी मुला ऐवजी जे रक्ताचे नमुने दिले त्याबाबत तपास करणे आहे.