21 C
New York

Noor Malabika Das : काजोलच्या को-स्टारचा सापडला लटकलेला मृतदेह

Published:

Noor Malabika Das: बॉलीवूडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘द ट्रायल’ (The Trial) या वेब सीरिजमध्ये काजोलबरोबर काम करणाऱ्या अभिनेत्रीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ३७ वर्षाची असलेली बॉलीवूड अभिनेत्री नूर मालाबिका दास (Noor Malabika Das) ही तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे. तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती, त्यानंतर ओशिवरामधले पोलीस (Oshivara Police) घटनास्थळी तिच्या घरी पोहोचले.

मिड डे ने दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस तिथे ताबडतोब पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या लोकांना तिच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली आणि त्यामुळे ही घटना उघडकीस आली. नूरच्या शेजाऱ्यांनी ओशिवरा पोलिसांना माहिती दिली. पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लगेच फ्लॅटचा दरवाजा तोडताच त्यांना समोर नूरचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. अभिनेत्री नूर मालाबिकाचा मृतदेह पोलिसांनी तिच्या लोखंडवाला येथील फ्लॅटमधून ६ जूनला हाती घेतला होता. नूरने बेडरूमच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. अभिनेत्रीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि पुढील कारवाई सुरु केली. अद्याप, तिच्या मृत्यूचे कारण समोर आलेलं नाही.

नूरच्या घरी तपासादरम्यान, पोलिसांनी तिचा मोबाईल फोन, औषध आणि एक डायरी जप्त केली. नूरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावमधील सिद्धार्थ रुग्णालयात घेऊन जाण्यात आला. अभिनेत्रींच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला पण कोणीही आलं नाही. कुटुंबामधून कोणीही मृतदेह घेण्यासाठी न आल्यामुळे पोलिसांनी शहरामधील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तिच्यावर रविवारी ९ जून रोजी अंत्यसंस्कार केले.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी बांधणार लग्नगाठ

अभिनेत्री नूर मालाबिका दास ही मूळची आसामची होती. नूरने अनेक वेब सिरीज (Web Series) आणि चित्रपटांमध्ये (Movies) काम केलं आहे. यामधल्या ‘तिखी चटनी’, ‘जघन्या उपाय’,‘सिसकियां’, ‘चरमसुख’, ‘देखी अनदेखी’, ‘बॅकरोड हलचल’ असा चित्रपटांचा समावेश आहे. नूरने स्वतःच एक वेगळं स्थान हिंदी वेब सीरिजच्या जगात निर्माण केलं होतं. “द ट्रायल” मध्ये नूरने सहाय्यक भूमिका साकारली होती, ज्यामुळे तिला महत्त्वपूर्ण ओळख मिळाली. नूरची कारकीर्द ज्वलंत होती आणि तिला तिच्या सहकाऱ्यांनी चांगलीच साथ दिली. नूर मालाबिका दास ही डिस्ने प्लस हॉटस्टारवरची (Disney Plus Hotstar) ‘द ट्रायल’ ह्या वेब सिरीजमध्ये ती शेवटची दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत कुब्बरा सैत, (Kubra Sait) शीबा चड्ढा, (Sheeba Chadda) आमिर अली मलिक (Aamir ali Malik) यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img