10.1 C
New York

Nhava Sheva : न्हावा शेवा बंदरातून 4.1 कोटीचे लॅपटॉप आणि सीपीयू जप्त

Published:

मुंबई

न्हावा शेवा (Nhava Sheva) बंदरातून 4.11 कोटी रुपयांचे लॅपटॉप आणि सीपीयू जप्त केलेत. गोपनीय माहितीच्या आधारावर कस्टम्स विभागाीने कारवाई केली. 600 वापरलेले लॅपटॉप आणि 1546 सीपीयू जप्त करण्यात आले आहेत. दुबईवरूनतस्करी करण्यात आलेले लॅपटॉप आणि सीपीयू जप्त कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, सीमाशुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 1546 सीपीयू यूएईमधून आयात करण्यात आले तर पुरवठादार हाँगकाँगमध्ये असल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, वापरलेले लॅपटॉप मदरबोर्ड केसिंग इ. इनलँड कंटेनर डेपो पटपरगंज, दिल्ली करिता तस्करी करण्यात आली. एसआयआयबी अधिकाऱ्यांनी मुंबई आणि दिल्ली येथे एकाच वेळी तपास घेत आयात करणाऱ्या फर्मच्या मास्टरमाइंड कम प्रोप्रायटरला अटक केली आहे.
 
सीमाशुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी आयातदाराच्या आवारातून 27.37 लाख रोख रक्कम जप्त केली आहे. कारण तस्करीच्या मालाची विक्री करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विभागाने कारवाईत दिल्ली एअर कार्गो कस्टम्समध्ये त्वरीत तपासात दोन समान शिपमेंट्स उघडकीस आल्या, ज्यात वापरलेले लॅपटॉप होते. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img