3.6 C
New York

Narendra Modi : मनसेबाबत मोदींनी केली ही घोर चूक, मनसे नेत्यांचा हल्लाबोल

Published:

औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता राज्यात महायुतीला (MahaYuti) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. लोकसभा निवडणुकीत एनडीएला (NDA) बहुमत मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 09 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्याचे निमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देण्यात आले नसल्याने मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

प्रकाश महाजन म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला बोलावलं असतं तर आनंद झाला असता असे वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केले आहे.

प्रकाश महाजन म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एनडीएचा भाग नसल्याने आम्हाला बैठकीला बोलवणे अपेक्षित नाही. पण एनडीए सरकारच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण देण्यात आले होते का हे सांगणारे माझ्यास्त्रीय कार्यकर्त्याला कठीण आहे. पण निमंत्रण असते तर कुठं दिसले असते. शपथविधीला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला असता आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन महायुतीसाठी आमच्या कार्यकर्ते राबत होते. महायुतीला राज्यात मोठी अपयश आल्याने निमंत्रण देण्यात विसरले असेल. मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये संपली आहे. गरज असल्यास उंबरठे झिजवायाचे आणि काम झाल्यावर दार लावायचे. त्याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले आहे. आमची त्यांच्यासोबत युती नव्हती, आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता. राज ठाकरे यांना निमंत्रण होते की नाही, हे फक्त स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सांगू शकतात, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img