21 C
New York

Coastal Road : कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला

Published:

मुंबई

बहुचर्चित असलेल्या मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पातील दक्षिण मुंबईला (South Mumbai) उत्तर मुंबईशी (North Mumbai) जोडणारा मरीन ड्राइव्ह (Marine Drive) ते वरळी (Worli) दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा 40 ते 50 मिनिटांचा प्रवास केवळ 8 मिनिटांमध्ये होणार आहे.

दरम्यान, ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत अशी 16 तास खुली ठेवली जाणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी ही मार्गिका बंद ठेवली जाणार आहे. कोस्टल रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागांत विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिंटेज कारद्वारे कोस्टल रोडची पाहणी केली. यावेळी एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर, तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार मागच्या सीटवर बसलेले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img