मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी मंत्रिपदांची (Modi Cabinet Portfolio) विभागणी केली आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना मागच्या वेळेप्रमाणेच स्थान देण्यात आले आहे. तर यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचीही वर्णी लागली आहे.
मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर 2014 पासून साग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलं आहे. प्रतापराव जाधव- आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री, रामदास आठवले सामाजिक न्यायमंत्री हे खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोणाला कोणतं मंत्रिपद
नरेंद्र मोदी – पंतप्रधान
कॅबिनेट मंत्री
- राजनाथ सिंह – संरक्षण
- अमित शाह – गृह
- अश्विनी वैष्णव – रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय
- एस. जयशंकर – परराष्ट्र
- नितीन गडकरी – परिवहन, रस्ते विकास
- अजय टमटा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री
- हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री
- मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय
- शिवराज सिंह चौहान – कृषी आणि किसान कल्याण, पंचायत तथा ग्रामविकास मंत्रालय
- जीतन राम मांझी – लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय
- निर्मला सीतारमण – अर्थ मंत्रालय
- सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय
- जे. पी. नड्डा – आरोग्य मंत्रालय
- चिराग पासवान- क्रीडा
- किरेन रिजिजू – संसदीय कार्य
- मनसुख मांडविया – कामगार
- श्रीपाद नाईक – ऊर्जा राज्यमंत्री
- अनुपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास
- राम मोहन नायडू – नागरी उड्डाण
- सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग
- शांतनू ठाकूर – पोर्ट शिपिंग राज्यमंत्री
- शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री
- धर्मेंद्र प्रधान – शिक्षण
- एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग
- शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री
- ज्योतिरादित्य सिंधिया – टेलिकॉम
- भूपेंद्र यादव – पर्यावरण
- प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण
- रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक राज्यमंत्री
- गजेंद्र शेखावत – कला, पर्यटन, सांस्कृतिक
- सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक राज्यमंत्री
- पीयूष गोयल – वाणिज्य
- ज्योतिरादित्य शिंदे- सूचना आणि प्रसारण मंत्री
मनसुख मंडाविया- कामगार मंत्री
हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री
एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री