8.3 C
New York

Modi Cabinet : मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; कोणाला कोणतं मंत्रिपद

Published:

मुंबई

मोदी कॅबिनेटचा (Modi Cabinet) शपथविधी पार पडल्यानंतर आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अमित शाह (Amit Shah) यांच्यावर पुन्हा एकदा गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. वाहतूक मंत्रालय नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 2 खासदारांना कॅबिनेटमंत्री करण्यात आलं आहे. तर 4 खासदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. यामध्ये एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आलं आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या एकाही खासदारा मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.

कोणाला कोणतं मंत्रिपद

नरेंद्र मोदी – पंतप्रधान

कॅबिनेट मंत्री

  • राजनाथ सिंह – संरक्षण
  • अमित शाह – गृह
  • अश्विनी वैष्णव – रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय
  • एस. जयशंकर – परराष्ट्र
  • नितीन गडकरी – परिवहन, रस्ते विकास
  • अजय टमटा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री
  • हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री
  • मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय
  • शिवराज सिंह चौहान – कृषी आणि किसान कल्याण, पंचायत तथा ग्रामविकास मंत्रालय
  • जीतन राम मांझी – लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय
  • निर्मला सीतारमण – अर्थ मंत्रालय
  • सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय
  • जे. पी. नड्डा – आरोग्य मंत्रालय
  • चिराग पासवान- क्रीडा
  • किरेन रिजिजू – संसदीय कार्य
  • मनसुख मांडविया – कामगार
  • श्रीपाद नाईक – ऊर्जा राज्यमंत्री
  • अनुपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास
  • राम मोहन नायडू – नागरी उड्डाण
  • सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग
  • शांतनू ठाकूर – पोर्ट शिपिंग राज्यमंत्री
  • शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री
  • धर्मेंद्र प्रधान – शिक्षण
  • एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग
  • शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री
  • ज्योतिरादित्य सिंधिया – टेलिकॉम
  • भूपेंद्र यादव – पर्यावरण
  • प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण
  • रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक राज्यमंत्री
  • गजेंद्र शेखावत – कला, पर्यटन, सांस्कृतिक
  • सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक राज्यमंत्री
  • पीयूष गोयल – वाणिज्य
  • ज्योतिरादित्य शिंदे- सूचना आणि प्रसारण मंत्री
    मनसुख मंडाविया- कामगार मंत्री
    हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री
    एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img