मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवला (Siddharth Jadhav) एका मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे झालेल्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये (Dadasaheb Phalke Film Festival 2024) अभिनेता सिद्धार्थ जाधवला बेस्ट अॅक्टर (ज्यूरी ) अवॉर्ड देण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेला बालभारती (Balbharati) या चित्रपटासाठी सिद्धार्थ जाधवला हा अवॉर्ड देण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे तसेच अवॉर्ड मिळाल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधवने प्रेक्षकांचे आभार मानले आहे.
बेस्ट अॅक्टर (JURY ) बालभारती नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौदाव्या “दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024” मध्ये आमचा सिनेमा “बालभारती”यासाठी मला जुरीचं “बेस्ट ऍक्टर” हे अवॉर्ड मिळालं.. मनापासून आनंद होतो “बालभारती” सिनेमातलं माझं काम राष्ट्रीय पातळीवर ऍप्रिसिएट केला जातय.. काम करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी कौतुकाची थाप देत आहे…देशभरातले सगळे रिजनल सिनेमे यात सहभागी झाले होते आणि त्यातून बालभारतीसाठी अवॉर्ड मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे …आमचे सुजय सर ,कोमल मॅम, संपूर्ण टीम आणि मनापासून आभार मानतो.., असं अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी बांधणार लग्नगाठ
नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झालेला ‘बालभारती’ चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधवसह अभिजित खांडकेकर, संजय मोने, नंदिता धुरी हे कलाकारा मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटामध्ये एका मुलाची शाळा बदलल्यामुळे त्याला कोणत्या कोणत्या अडचणी येतात आणि त्यावर तो कशी मात करतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर सध्या सिद्धार्थवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.