3.8 C
New York

ShivSena : …तर दोन्हीही शिवसेना एकत्रित येईल, शिंदे गटातील नेत्याचा दावा

Published:

मुंबई

शिवसेनेमध्ये (ShivSena) उभी फूट पडल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप घडला होता. शिवसेना दोन विभागात विभाज्य गेली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कडे दिले. त्यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात संघर्ष दिवसात दिवसात वाढत आहे. मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दोन्हीही शिवसेना एकत्र येण्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेना पक्षाची खरी संपत्ती शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत. परंतु काही लोकांची निष्ठा बदलली आहे. त्यांना आता शिवसेना प्रमुखांपेक्षा शरद पवार, राहुल गांधी दौलत वाटत आहे. त्यांच्या आणि आमच्या विचारसरणीमध्ये खूप फरक आहे. त्याचा आम्हाला त्रास होतो. त्यामुळेच आम्ही बाहेर पडलो होतो. आताही त्यांनी त्यांची दिशा बदलली तर दोन्हीही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात असं दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे 48 पैकी 30 खासदार निवडून आले आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीला मोठा फटका बसला आहे. महायुतीचे 17 खासदार निवडून आले आहे. त्यामुळे अनेक खासदार शिंदे गटातून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img