8.4 C
New York

IND vs PAK : पाकिस्तानवर मात, टीम इंडियाचा थरारक विजय

Published:

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये एक हाय व्होल्टेज सामना झाला. 9 जून (रविवारी) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 6 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. यामध्ये टीम इंडियाने अखेर बाजी मारली.पाकिस्तानवर 6 धावांनी टीम इंडियाने शानदार विजय मिळवला आहे. पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं टीम इंडियाने आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार बॉलिंग करत पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 113 धावांवर रोखलं.

IND vs PAK भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला घाम फोडला

भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. जसप्रीत बुमराह पाकिस्तानचा तीन विकेट घेतल्या. आणि हार्दिक पांड्यानं पाकिस्तानच्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. अक्षर पटेलनं देखील महत्त्वाची विकेट घेतली. अर्शदीप सिंगनं इमाद वसीमला बाद केलं. पाकिस्तानची 120 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. पाकिस्तान ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्यानुसार तेच जिंकणार, असं चित्र होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत पाकिस्तानचा पराभूत केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान याने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर बाबर आझम, उस्मा खान आणि फखर झमान या तिघांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. तर इमाद वसीमने 15 धावांचं योगदान दिलं. शादाब खान 4 आणि इफ्तिखार अहमदने 5 धावा केल्या. नसीम शाह याने नाबाद 10 धावा केल्या. तर शाहिन अफ्रिदी 0 वर नाबाद परतला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने 4 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

‘हे’ मीडिया हाऊसेस येणार सर्वोच्च न्यायालयाच्या गोत्यात?

एकेकाळी भारताची धावसंख्या तीन गडी बाद 89 धावा होती आणि या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळेल असे वाटत होते, पण पाकिस्तानी गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत भारताला एकामागोमाग धक्के दिले. भारताने 30 धावांत 7 विकेट गमावल्या. भारतीय संघ केवळ 19 षटके खेळू शकला आणि 119 धावा केल्या. ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. भारताकडून ऋषभ पंतने 31 चेंडूत 6 चौकारांसह सर्वाधिक 42 धावा केल्या. पाकिस्तानकडून अक्षर पटेलने 18 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या, तर हरिस रौफ आणि नसीम शाहने प्रत्येकी 3 बळी घेतले. तर मोहम्मद आमिरला 2 विकेट मिळाल्या.

IND vs PAK बुमराहबाबत मोठे वक्तव्य

रोहित शर्माने जसप्रीत बुमराहबद्दल सांगितलं की, जसप्रीत बुमराह चांगली कामगिरी केली. तो काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही. त्याने या वर्ल्ड कपच्या शेवटपर्यंत त्याच मानसिकतेत राहावं अशी आमची इच्छा आहे, तो चेंडू टाकण्यात हुशार आहे असही रोहीत म्हणाला. चाहत्यांबद्दल विचारले असता रोहित शर्मा म्हणाला की, गर्दी विलक्षण होती, त्यांनी कधीही निराश केलं नाही, आम्ही जगात कुठेही खेळलो तर चाहते मोठ्या संख्येने येतात. आणि आम्हाला साथ देतात.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (WK), बाबर आझम (C), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर.

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (C), विराट कोहली, ऋषभ पंत (WK), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img