21 C
New York

Ambernath Crime : अंबरनाथ MIDC मधून अल्युमिनियमची चोरी

Published:

उल्हासनगर

नॅशनल पॉवर ग्रिड अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड ही कंपनी राष्ट्रीय पातळीवरचा एक महत्वाचा प्रोजेक्ट राबवत आहे. या कंपनीसोबत ट्रांसमिशनसाठी के ई सी इंटरनेशनल लिमिटेड ही कंपनी सब contracter म्हणून काम करत आहे. या कंपनीचे अंबरनाथ एमआयडीसी (MIDC) मध्ये प्रोजेक्टचे काम सुरू असताना 27 मे च्या रात्री साइटवरून ट्रांसमिशन साठी लावलेल्या 25 लाख रुपयांच्या एल्युमीनियमच्या तारा या काही अज्ञात चोरट्यांनी चोरल्या होत्या. या संबंधी अंबरनाथ (Ambernath Crime) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी तब्बल 12 आरोपीना अटक केली आहे.

उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने 12 आरोपींना अटक केली असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्रथम पोलिसांनी या घटनेतील आरोपी आणि सराईत गुन्हेगार तौकीर जमालुद्दीन खान याला 24 तासांच्या आत मुंबईतील धारावी येथून अटक केली, त्यानंतर त्याची सखोल चौकशी करून घटनेतील इतर आरोपी सरोजकुमार जयस्वार, गणेश पटेल, अरुण सिंग, आकाश मीना, समीर खान, विकास म्हेत्रे, परवेझ खान, शिवकरण गुप्ता, रामलाल पटेल, कादर खान आणि सद्दाम अली यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरला गेलेल्या अल्युमियमच्या तारा, गुन्ह्यात वापरलेली कार, 1 पिकअप आणि 2 मिनी टेम्पो असा जवळपास 29 लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img