7.3 C
New York

Narendra Modi : तिसऱ्यांदा PM होताच मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची (Narendra Modi) शपथ घेतली. रविवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेताना पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विक्रमाची बरोबरी केली. मोदी 3.0 सरकारच्या पहिल्याच दिवशी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता सोमवारी जारी करण्यात आला आहे. याचा ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ७१ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आज मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला आहे. देशाच्या इतिहासात फक्त पंडित जवाहरलाल नेहरु हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या विक्रमाची बरोबरी नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी (10 जून) पीएम मोदींनी किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करण्यासंदर्भातील फाइलवर मोदींनी स्वाक्षरी केली आहे. (PM’s 1st order in third term, signs off on release of PM Kisan Nidhi funds) पंतप्रधान किसान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. याचा फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार असून अंदाजे 20 हजार कोटी रुपये वितरित केले जाणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिली कॅबिनेट बैठकही आज होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकते, असा अंदाज आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सरकार सर्व मंत्र्यांना मंत्रिपदाचे वाटप करू शकते.

मोदींचं नवीन मंत्रिमंडळ तयार, पाहा संपूर्ण यादी

Narendra Modi काय म्हणाले पीएम मोदी?

किसान सन्मान निधीच्य फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर मोदींनी मी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त काम करायचे आहे. आमचे सरकार यासाठी सातत्याने काम करत आले असून, यापुढेही करत राहील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. यापूर्वी, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, 16 व्या हप्त्याचे पैसे 28 फेब्रुवारी रोजी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले गेले होते. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. तथापि, पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत, ही रक्कम एकरकमी नाही तर 2000-2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.

Narendra Modi असा चेक करा तुमचा हप्ता

यापूर्वी पीएम शेतकरी सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) 16 हप्ता 28 फेब्रुवारी रोजी आला होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खाती आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे. तसेच बँकेत केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in वर जाऊन आपल्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा 17 वा हप्ता जारी झाला की नाही? हे तपासून घेऊन शकतात. तसेच यासंदर्भात काही अडचण असल्यास हेल्पलाइन (1800-115-5525) वर संपर्क करु शकतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img