3.7 C
New York

Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी बांधणार लग्नगाठ

Published:

Sonakshi Sinha: शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी अडकणार लग्नबंधनात.

Sonakshi Sinha: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते वर खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ३७ वर्षाची लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालशी (Zaheer Iqbal) २३ जून रोजी मुंबईत लग्न करणार आहे. सोनाक्षी आणि झहीर बऱ्याच काळापासून एकमेकांना देत करत आहेत. पण एकमेकांच्या नात्याबद्धल दोघांनीही जाहीरपणे कधीही सांगितलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न २३ जूनला होणार असल्याचं वृत्त आहे. आणि त्यांच्या लग्नात जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त फक्त ‘हीरामंडी’च्या (Heeramandi) सर्व कलाकारांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका एक खास पद्धतीने डिझाईन करण्यात आलीये, असं म्हंटल जातंय. ‘अफवा खऱ्या आहेत’ असं पत्रिकेच्या पहिल्या पानावर लिहिलंय. तसंच सर्व पाहुण्यांना लग्नामध्ये फॉर्मल्समध्ये येण्यास सांगितलं आहे. सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाचा सोहळा मुंबईमधील बास्टियन येथे होणार असल्याची माहिती समोर आलीये.

मुंबईमध्ये तब्बल १४ कोटींचे आलिशान घर खरेदी केलं…रणबीरची झाली बाजूवाली

एकत्र इव्हेंट्सला दिसतात सोनाक्षी व झहीर
इव्हेंट असो व कोणती पार्टी असो सोनाक्षी आणि झहीर अनेकदा एकत्र हजेरी लावताना दिसत असतात. बऱ्याचवेळा दोघांचे फोटोशूटही चर्चेत असतात. दोघे एकत्र व्हॅकेशनसाठी सुद्धा जात असतात. सोनाक्षी किंवा झहीर एकमेकांचे फोटो किंवा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतात. २ जूनला सोनाक्षी सिन्हाचा वाढदिवस झाला त्यादिवशी झहीरने तिच्यासोबतचे ४ फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आणि सोनाक्षीने त्या फोटोवर कमेंटही केली होती.

सोनाक्षी व झहीरने एकत्र केलेला चित्रपट
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने एका चित्रपटामध्ये काम केलं आहे. दोन वर्षाआधी २०२२ मध्ये आलेला ‘डबल एक्सएल’ (Double XL) या चित्रपटात सोनाक्षीने व झहीर एकत्र झळकले होते. या चित्रपटानंतरच दोघांच्या नात्याची चर्चा रंगली होती. मात्र दोघांनीही कधीच नात्याबद्दल उघड केलं नाही. दोघेही एकमेकांसाठी वाढदिवसादिवशी पोस्ट करताना दिसतात व इव्हेंट्सला हजेरी लावताना दिसत असतात. आणि अशातच आता दोघे २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हंटल जातंय. मात्र अद्याप दोघांच्या कुटुंबीयांनीसुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img