19.7 C
New York

PM Modi Cabinet : 27 ओबीसी, 15 एसटी अन्… कसं आहे मोदींचं मंत्रिमंडळ?

Published:

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह (रविवारी 09 जून) 71 मंत्र्यांनी शपथ घेतली. यापैकी 30 कॅबिनेट तर 36 जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी (PM Modi Cabinet) देशातील 24 राज्यांना प्रतिनिधित्व मिळाला असून 27 ओबीसी, 15 एससी/एसटी तर अल्पसंख्याक समाजातील 5 मंत्र्यांचा नवीन मंत्री मंडळात समावेश करण्यात आला. तसेच एनडीएमधील (NDA) 11 घटक पक्षांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. तर निर्मला सीतारामन, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांनी सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली आहे.

याच बरोबर मुख्यमंत्र्यांना नरेंद्र मोदींच्या नवीन मंत्री मंडळात शिवराज सिंह चौहान, एचडी कुमारस्वामी, जीतन राम मांझी आणि मनोहर लाल खट्टर यांना स्थान देण्यात आले आहे. सहा वेळा ओडिशाचे खासदार आणि लोकप्रिय आदिवासी चेहरा जुआल ओरम यांनीही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात झारखंडच्या ओबीसी नेत्या अन्नपूर्णा देवी यांचाही समावेश झाला आहे. एनडीएला लोकसभा निवडणुकीत 292 जागा मिळाल्याने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली होती.

मराठवाडा, कोकणाकडे मोदींची पाठ; मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नाही

यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी एनडीएचे सर्व घटक पक्षातील नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240, काँग्रेसला 99, समाजवादी पक्षाला 36, टीडीपीला 15, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूला 12, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 07 जागांवर विजय मिळाला आहे. तर इंडिया आघाडीला 240 जागा मिळाले आहे. यामध्ये काँग्रेसला 99, समाजवादी पक्षाला 36 जागा मिळाले आहे तर ठाकरे गटाला 10 तर शरद पवार गटाला 07 जागा मिळाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img