पुणे
मान्सूनपूर्व पावसाने पुणे शहरांमध्ये (Pune Rain) कालपासून दि.08 रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघा तासभर पडलेल्या या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. पुणे शहरातील (Punr News) प्रमुख असणाऱ्या या परिसरातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे पुणे महानगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे.
अवकाळी पावसामुळे शहरातील पर्वती, डेक्कन पाषाण परिसरात तुफान पाऊस कोसळला. या पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने तसेच अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनांनी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणाऱ्या पुण्यात नालेसफाई न झाल्याचाही मोठा फटका बसला. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील पावसावरून भाजपला टोला लगावला काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे.
पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.