6.2 C
New York

Narendra Modi : मी नरेंद्र दामोदरदास मोदी… मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ

Published:

नवी दिल्ली

मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ की असे म्हणत मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्याचा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य खासदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी सत्ताधारी एनडीएच्या खासदारांसह विरोधी पक्षांतील खासदार उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, शिवराज सिंग चव्हाण यांनी शपथ घेतली आहे.

अठराव्या लोकसभेचा निकाल हा गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा थोडासा वेगळा लागला आहे. या निवडणुकीत भाजपच्या 63 जागा घटल्या आहेत. तर काँग्रेसच्या 47 जागा वाढल्या आहेत. तरीही या निवडणुकीत एनडीए आघाडी ही इंडिया आघाडीवर सरस ठरली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. या निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पक्ष किंगमेकर ठरले आहेत. हे दोन्ही पक्ष एनडीएसोबत खमकेपणाने सोबत राहिल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचं नवं सरकार स्थापन झालं आहे.

भारताशेजारील बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान या देशांच्या प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताणलेले संबंध पाहता यंदाही पाकिस्तानला निमंत्रण नव्हतं. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. येथे सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडेकोट ठेवण्यात आली होती. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर होती.

आता सन 2024 मध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. मोदी हे एकमेव असे नेते आहेत जे इतक्या मोठ्या काळापासून सत्तेत आहेत. 2001 ते 2014 पर्यंत नरेंद्र मोदी सलग तेरा वर्ष मुख्यमंत्री होते. त्यानंतर दहा वर्ष पंतप्रधान होते. काही दिवसांपूर्वी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये केलेल्या भाषणात पुढील दहा वर्षे सत्तेत कायम राहू असा दावा त्यांनी केला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img