3 C
New York

Otur Crime : ओतूर येथे ज्येष्ठ नागरिकाचा गळा आवळून खून

Published:

रमेश तांबे, ओतूर

ओतूर येथील (Otur Crime) एका ज्येष्ठ नागरिक इसमाचा अज्ञात व्यक्तीने मारहाण करून, गळा आवळून त्याचा खून केला आहे. सदरची घटना शुक्रवारी दि.७ रोजी रात्री साडेनऊ ते शनिवारी दि.८ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नबाब अहमद शेख वय ७२ वर्षे,राहणार ओतूर ता.जुन्नर जिल्हा पुणे असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिक इसमाचे नाव आहे. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे हे अधिक माहिती देताना म्हणाले की,नबाब अहमद शेख आणि त्यांचा भाऊ ओतूर ता.जुन्नर,जि.पुणे गावचे हद्दीत वडारवस्ती शेजारील पानसरे यांच्या जुन्या इमारतीत पश्चिम बाजुच्या एक नंबर खोलीत राहत होते. घटना घडली त्या दिवशी शेख यांचा भाऊ बाहेर गावी गेला 

असताना शुक्रवारी दि.७ रोजी रात्री साडेनऊ ते शनिवारी दि.८ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने कुठल्यातरी कारणासाठी अज्ञात वस्तुने नबाब शेख यांच्या हनुवटीवर मारून त्यांना जखमी केले व कशाने तरी त्यांचा गळा आवळून त्यांचा खून केला आहे. याबाबतची नबाब यांचा मुलगा शादाब नबाब शेख वय ४२ वर्षे, मुळ रा.निमोन तास ता. संगमनेर जि.अहमदनगर सध्या. रा.वडगाव पान ता.संगमनेर जि.अहमदनगर यांने ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे    उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी,थाटे हे करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img