3.8 C
New York

Modi Cabinet : राणे, कराड यांचा पत्ता कट, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान नाही

Published:

नवी दिल्ली

नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सायंकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधी समारंभ होणार आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशातील 36 मंत्री शपथ (Modi Cabinet) घेणार आहे तर राज्यातील सहा मंत्र्यांचा यामध्ये समावेश असणार आहे मात्र मागील टर्ममध्ये मोदी सरकारमध्ये (Modi 3.0) असलेल्या राज्यातील दोन दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. विशेषतः महायुतीला द्या कोकणपट्ट्यात सर्वाधिक जागा मिळाल्या त्याच कोकणातील एकही विजयी उमेदवाराला मोदी सरकारमध्ये स्थान मिळणार नसल्याची शक्यता आहे.

मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नारायण राणे यांच्याकडे शूक्ष्म व लघु उद्योगमंत्री होते. तर भागवत कराड हे राज्य अर्थमंत्री होते. खरं म्हणजे नारायण राणे यांना यावेळीदेखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कारण ते कोकणातील एक मोठा चेहरा आहेत. दुसरीडे भागवत कराड हेदखील मराठवाड्यातील मोठे नाव आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्ष मात्र आता मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली जाणार नसल्याचं सांगितलं जातंय. त्यामुले आता कराड आणि राणे या दोघांचाही पत्ता कट झाल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला 17 जागा मिळाल्या आहे. मात्र यामध्ये कोकणपट्ट्यातील चार खासदारांचा समावेश आहे. सर्वाधिक जागा मिळवून देणाऱ्या कोकण पट्ट्यातील एकही खासदाराला नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येण्याची शक्यता कमी आहे. कोकणपट्ट्यातून निवडून आलेल्या खासदारांपैकी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे, अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे, शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे तसेच नरेश म्हस्के यांचा या कोकणपट्ट्यातील खासदारांमध्ये समावेश आहे. मात्र यापैकी एकाही वर्णी मंत्रिमंडळात लागणार नसल्यास सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या मागील टर्म मध्ये कोकणातील नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री पदावर वरली लागली होती. मात्र नारायण राणे यांचे कामकाजावर केंद्रीय नेतृत्व समाधानी नसल्याचं अनेकदा चर्चा समोर येत होत्या. तसेच नारायण राणे यांचे सभागृहातील भाषणवर देखील सोशल मीडियावर चांगलीच टीका झाली होती. नारायण राणे यांना देण्यात आलेल्या विभागात समाधानकारक काम नसल्याचेही बोलले जात होतं. त्यामुळेच या वेळी नारायण राणे यांचा पत्ता कट करण्यात आलं असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

नारायण राणे आणि कराड यांना संधी मिळणार नसली तरी दुसरीकडे भाजपने राज्यात मराठा मतदारांची नाराजी लक्षात घेऊन मंत्रिमंडळात मराठा समाजाच्या नेत्यांना स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुरलीधर मोहोळ, प्रतापाराव जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. आज संध्याकाळी सव्वा सात वाजता मोदी यांच्यासोबत हे नेते मंत्रिपदाची शपथ घेताना पाहायला मिळतील.

भागवत कराड हे ओबीसींचे नेते आहेत. त्यांच्या जागेवर भाजपने रक्षा खडसे यांना भाजपने संधी दिली आहे. खडसे या उत्तर महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे एका मराठा आणि ओबीसी नेत्याच्या बदल्यात दुसऱ्या मराठा आणि ओबीसी नेत्याला मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img