गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या पवासाचे अखेर राज्यात आगमन झाले आहे. उकाडा आणि आर्द्रतेमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांनाही पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पहाटेपासूनच मुंबईत विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून त्यामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याती नागरिकांना प्रचंड उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा सहन करावा लागत होता. मात्र आज पावसाचे आगमन झाल्यामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळू शकतो.
महाराष्ट्रात 6 जून रोजी मान्सूनचे (Monsoon Rain Update ) आगमन झाले आहे. त्यामुळे सध्या राज्यात ( Maharashtra ) अनेक भागांमध्ये दमदार पाऊस होत आहे. मान्सूनची राज्यात जोरदार आगेकूच सुरू आहे. त्यानंतर मुंबईसह ठाण्यात पुढचे तीन दिवस जोरदार पावसाची ( Rain ) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत मुंबई सह ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागाला यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुढील 48 तासांत हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
… असा पार पडणार मोदींचा शपथविधी
दरम्यान शनिवारी पुणे शहरात दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांची मोठी पंचायत होत आहे. पाषाण, बाणेर, औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड या भागात मुसळधार पाऊस झाला. तर वारजे माळवाडी, कोथरुड, घोरपडी, लोहगावसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्याच बरोबर सिंहगड रस्त्यावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. असल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास अडचण आली होती. मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार अशी चर्चा होती. आता मात्र नागरिकांना चांगली बातमी मिळाली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाचं आज आगमन झालं. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. त्यामुळे वातावरणात बदल झाला होता. राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान दिसत आहे.
Monsoon Rain Update मावळमध्येही पावसाचं जोरदार आगमन
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सहयाद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या मावळमध्येही मान्सूनचं जोरदार आगमन झाले असून रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. तसेच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून नागरिकांना उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा सहन करावा लागत होता मात्र पावसाच्या आगमनामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . दरम्यान नवी मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.