6.2 C
New York

Narendra Modi : … असा पार पडणार मोदींचा शपथविधी

Published:

देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन होत असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज ( 9 जून ) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ ( Oath Ceremony ) घेणार आहेत. त्यांचा हा तिसरा शपथविधी सोहळा अत्यंत खास असणार आहे यासाठी देशासह जगभरातून आठ हजार विशेष अतिथिन्ना निमंत्रण देण्यात आला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर स्वादिष्ट अशा मेजवानीच आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा नेमका कसा होणार आहे? जाणून घेऊ…

राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाला आठ हजार विशेष अतिथी उपस्थित राहणार आहेत. शेजारील देशांचे प्रतिनिधी, यांच्यासह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर वंदे भारत ट्रेनच्या ब्लोको पायलट सुरेखा यादव या उपस्थित राहणार आहेत. त्या आशियातील पहिल्या महिला लोकोमोटिव्ह पायलट आहेत. त्याचबरोबर चेन्नई रेल्वे विभागातील वंदे भारत लोको पायलट ऐश्वर्या एस. मेनन यांसह १० लोको पायलटना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. सफाई कर्मचारी, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात योगदान देणारे मजूर शपथविधी समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मोदींच्या शपथविधीच्या दिवशी, कलम 144 लागू

Narendra Modi कसं आहे सोहळ्याचं आयोजन?

शपथविधी समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या अतिथींसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने समारंभाच्या तयारीची एक चित्रफीत शनिवारी प्रसिद्ध केली. या समारंभासाठी मोठ्या संख्येने खुर्च्या मांडल्या आहेत. त्या पांढऱ्या कपड्याने झाकलेल्या आहेत. समारंभासाठी लाल गालिचा अंथरण्यात आला आहे. आज रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर स्वादिष्ट अशा मेजवानीच आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती भवनाच्या स्वयंपाकघरातील खास पदार्थ समारंभानंतर आयोजित मेजवानीत अतिथींना देण्यात येणार आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशातील सर्व प्रमुख प्रदेशांतील स्वादिष्ट पदार्थांसह पारंपरिक शाकाहारी थाळी दिली जाणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img