23.1 C
New York

Modi Cabinet : मराठवाडा, कोकणाकडे मोदींची पाठ; मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नाही

Published:

मुंबई

नरेंद्र मोदी  (Narendra Modi) यांच्या पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील शपथ देण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश आहे मात्र मोदींच्या मंत्रिमंडळात (Modi Cabinet) मराठवाडा (Marathwada) आणि कोकण (Konkan) या विभागातील खासदारांचा समावेश नसणार आहे. त्यामुळे मोदींनी कोकण आणि मराठवाड्याकडे पाठ फिरवली असल्याचं चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. त्यांच्याबरोबर आणखीही काही खासदार शपथ घेतील. यामध्ये महाराष्ट्रातील खासदार असतील. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उत्तर महाराष्ट्र येथील खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. पण, कोकण आणि मराठवाड्याची पाटी यंदा कोरी राहणार असल्याचे दिसत आहे. यंदा मंत्रिपदासाठी मराठवाड्याचा विचार झालेला नाही. मागील सरकारमध्ये डॉ. भागवत कराड अर्थ राज्यमंत्री होते यंदा त्यांचाही विचार भाजप नेतृत्वाने केलेला नाही.

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीची मोठी पिछेहाट झाली. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात फक्त छत्रपती संभाजीनगर येथेच शिंदे गटाचे संदिपान भुमरे विजयी झाले. अन्य 8 जिल्ह्यांतून महायुती हद्दपार झाली. यंदा अख्ख्या मराठवाड्यात एकही खासदार भाजपाचा नाही अशी परिस्थिती आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे मागील सरकारमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होते. या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. त्यामुळे दानवे आता मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. बीड मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रुपात महायुतीला छत्रपती संभाजीनगरची जागा मिळाली. या पराभवामुळे येथे मंत्रिपद कुणाला द्यायचे याचा प्रश्न उद्भवत नव्हता. संदिपान भुमरे यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. परंतु, शिंदे गटाने बुलडाण्यातील अनुभवी नेते प्रतापराव जाधव यांचं नाव पुढं केलं. त्यामुळे भुमरे यांचं नाव मागे पडलं. निवडणुकीच्या काळात डॉ. भागवत कराड यांच्याकडे परभणी, हिंगोलीसह आणखी काही मतदारसंघांची प्रभारी म्हणून जबाबादारी देण्यात आली होती. मात्र या सगळ्याच मतदारसंघात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांना यंदा संधी मिळाली नाही असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या निवडणुकीत कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजप नेते नारायण राणे यांनी विजय मिळवला. मागील सरकारमध्ये राणे मंत्री होते. त्यांना यंदाही संधी मिळेल अशी शक्यता होती. परंतु, भाजपने त्यांचा विचार केल्याचं दिसत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे दिसणार नाहीत. दुसरीकडे मुंबईतून भाजपने पुन्हा पियूष गोयल यांना संधी दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img