26.6 C
New York

Lok Sabha Election : फ्यूचर पॉलिटिक्स साधत ‘या’ नेत्यांना मंत्रिपदाची संधी

Published:

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) आज एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांचा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्याबरोबर आणखी काही खासदार शपथ घेतील. यासाठी आज सकाळपासूनच भाजपसह एनडीएतील घटकपक्षांच्या खासदारांचे फोन खणखणत आहेत. खासदारांना मंत्रिपदासाठी विचारणा होत आहे. मात्र या सगळ्यात भाजप खासदार नारायण राणे आणि भागवत कराड या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही अशी माहिती समोर येत आहे. राणे आणि कराड दोघेही याआधीच्या सरकारमध्ये मंत्री होते. यंदा मात्र भाजप नेतृत्वाने त्यांचा विचार केल्याचं दिसत नाही.

यंदाच्या निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे. भाजपाच्या 63 जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे बहुमत दूरच राहिले फक्त 240 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एनडीए आघाडीचं बहुमत मात्र झालं आहे. आघाडीतील घटक पक्षांनी समर्थनाचं पत्रही देऊन टाकलं आहे. अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोदी सरकारमध्ये राष्ट्रवादीला स्थान नाहीच?

रविवारी मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आणखीही काही खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये महाराष्ट्रातील काही खासदारांची नावं समोर आली आहेत. महाराष्ट्रातून खासदार रक्षा खडसे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, पियूष गोयल, नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ असे काही खासदार शपथ घेतील अशी शक्यता आहे. मात्र यात अनेक खासदारांची मंत्रिपदाची इच्छा अपूर्ण राहिल्याचे दिसत आहे. नारायण राणे आणि डॉ. भागवत कराड यांना या सरकारमध्ये जागा मिळणार नाही हे आता स्पष्ट होत आहे.

मोदी यांच्याबरोबर आणखी 41 खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. राज्यातील खासदारांना मंत्रि‍पद देताना जातीचं समीकरणही साधलं आहे. विदर्भातून नितीन गडकरी आणि प्रतापराव जाधव यांना संधी दिली आहे. उत्तर महाराष्ट्रातून पराभूत झालेल्या भारती पवार यांच्याऐवजी रक्षा खडसेंना संधी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ तर मुंबईतून पीयूष गोयल यांना संधी दिली आहे.

राष्ट्रवादीला भोपळा, अजितदादा नाराज

दरम्यान, आज सकाळपासूनच भाजपसह एनडीएतील घटकपक्षांच्या खासदारांचे फोन खणखणत आहेत. खासदारांना मंत्रिपदासाठी विचारणा होत आहे. मात्र या सगळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नाव मागे पडलं आहे. कालपर्यंत प्रफुल पटेल यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं. परंतु, आज दिवस उगवल्यानंतर मात्र अजित पवारांच्या खासदारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही अशी माहिती मिळत आहे. या घडामोडींमुळे अजित पवारही नाराज झाल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील नेते मंडळी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img