3.7 C
New York

Sonia Gandhi : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड

Published:

आज शनिवारी (08 जून) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाची (Congress Parliamentary Meeting) बैठक पार पडली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची निवड या बैठकीमध्ये करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी या बैठकीमध्ये ठेवला होता जो एकमताने मान्य करण्यात आला. या बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता तर खासदार गौरव गोगोई, तारिक अन्वर, के सुधाकरन यांनी पाठिंबा दिला. याबाबत माहिती देताना, काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी म्हणाले की, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीने टाकला होता मोठा डाव…

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोनिया गांधी म्हणाले, या निवडणुकीत देशाच्या जनतेने विभाजन आणि हुकूमशाहीचे राजकारण नाकारण्यासाठी मतदान केले आहे, त्यांनी संसदीय राजकारण बळकट करण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठीमतदान केले आहे. ‘भारत जोडो यात्रा’ आणि ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मुळे काँग्रेसला प्रत्येक स्तरावर नवसंजीवनी मिळाली. यामुळे राहुल गांधी विशेष आभाराचे पात्र आहेत असं सोनिया गांधी म्हणाले.

तर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. यावर राहुल गांधी काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. नुकतंच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत तर भाजपला 240 जागा मिळालेल्या आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img