21 C
New York

Pune Rain : पुणेकरांनो बाहेर पडू नका, पुढील तीन तास महत्त्वाचे

Published:

पुणे, मुंबई शहरात मुसळधार पाऊस झाला आहे. (Pune Rain) पुण्यात पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले आहे. पुणे शहरात आज दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून यामुळे नागरिकांची मोठी पंचायत होत आहे. पाषाण, बाणेर, औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड या भागात मुसळधार पाऊस होत आहे तर वारजे माळवाडी, कोथरुड, घोरपडी, लोहगावसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्याच बरोबर सिंहगड रस्त्यावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास अडचण येत आहे.

माहितीनुसार, विद्यापीठ गणेश खिंड परिसरात मुसळधार पावसामुळे स्त्यावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.याच बरोबर अर्ध्याच्यावर चार चाकी पाण्यात बुडाले आहे. आज शनिवार असल्याने सरकारी आणि अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी असते यामुळे रस्त्यावर वर्दळ नेहमीपेक्षा कमी होती. मात्र पावसामुळे दुचाकी आणि चार चाकी रस्त्यावर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे पुणे शहरात आज कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती, तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असल्याने पुणेकरांना घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरात आज झालेल्या पावसामुळे पुणे मनपाची ड्रेनेज व्यवस्था कोलमडली आहे. शहरातील बहुतेक भागात ट्रॅफिक जॅम झाल्याने नागरिकांचे हाल होत आहे. पाणी निचरा होण्यासाठी जागाच नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणीरस्त्यांवर पाणी साचत आहे. मात्र 7000 करोड रुपये दर वर्षी घरपट्टी कर वसूल करणारी पुणे मनपा या रकमेचा काय करते असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडत आहे.

राज्यात मान्सूनची दमदार आगेकूच!

Pune Rain पुण्यात तिघे अडकले, रेस्क्यू करुन सुटका

पुण्यात शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर ओटा याठिकाणी झाडपडून एका व्यक्तीच्या मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाकडे आज पहाटेपर्यंत शहराच्या विविध भागातील झापटपट्टीत एकूण 55 ठिकाणी पाणी शिरले आहे. तसेच 22 आणि भिंत पडल्या. पुण्यात एकूण 79 घटनांची नोंद झाली.

Pune Rain साडेपाच वाजेपर्यंत कोणत्या भागात किती पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर 67.4, पाषाण 56.8, इंदापूर 11.5, हडपसर 3.0, हवेली 1.5, बल्लाळवाडी 0.5 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img