26.6 C
New York

Modi Cabinet : अजित पवार गटाला मंत्रिपद नाही, फडणवीसांनी सांगितले कारण

Published:

नवी दिल्ली

नरेंद्र मोदी (Narnerda Modi) यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळा आज सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवन येथे होणार आहे. या सोहळ्यामध्ये मोदी सरकारमधील 36 मंत्री शपथ (Modi Cabinet) घेणार आहे. एनडीए (NDA) मधील सहभागी असलेल्या घटक पक्षातील खासदारांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे. मात्र राज्यातील अजित पवार गटातील (Ajit Pawar Group) एकही मंत्री या शपथविधी सोहळा मंत्री पदाची शपथ घेणार नाही आहे. यावर आता भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्यावतीने तथा सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशाप्रकारची जागा त्यांना देण्यात आली होती. पण त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. मात्र आपल्यालादेखील कल्पना आहे की जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा त्यावेळी काही निकष तयार करायचे असतात. कारण अनेक पक्ष तेव्हा सोबत असतात. त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मला विश्वास आहे भविष्यात मंत्रिमंडळात विस्तार होईल तेव्हा निश्चितपणे त्यांचा विचार होईल. आताही समावेशाचा प्रयत्न केला गेला. किंबहुना त्यांना आमच्याकडून ऑफर देण्यात आली होती. त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पुढच्यावेळेस दिलं तेव्हा चालेल पण आम्हाला मंत्रिपद द्या असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img