3.7 C
New York

Team India : भारताविरुद्ध सामन्यासाठी पाकिस्तान संघात मोठा बदल

Published:

टी 20 विश्वचषक स्पर्धेत आज सर्वाधिक हाय होल्टेज सामना होणार आहे. (Team India) आज रात्री आठ वाजता न्यूयॉर्क शहरातील नासाऊ काउंटी स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. देश विदेशातील कोट्यावधी क्रिकेट प्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सामना सुरू होण्याआधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने संघात एक मोठा बदल केला आहे. अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम याची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे. लठ्ठपणा आणि खराब कामगिरीमुळे ट्रोल होत असलेल्या आझम खानला संधी मिळणार नाही अशीच शक्यता व्यक्त होत आहे.

T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील ही 19 वी मॅच असेल आज संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार आठ वाजता हा सामना सुरू होईल. अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरांमध्ये हा सामना पार पडणार आहे. मात्र यावेळी हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने या सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाला आहे. त्यावेळी पावसाची शक्यता 30 ते 40% आहे. दुपारी एक वाजेनंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्ध काटे की टक्कर

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने (Team India) आपल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडचा (Ireland) आठ गडी राखून पराभव केला आहे तर पाकिस्तानला (Pakistan) पहिल्या सामन्यात अमेरिकेने (USA) धक्का देत सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. पहिल्या पराभवामुळे पाकिस्तानसाठी आजचा सामना खूप महत्वाचा आहे. यासाठी कोणताही धोका पत्करण्याच्या मानसिकतेत पाकिस्तान नाही. पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार भारताविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघात एक बदल होणार आहे. इमाद वसीमला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर खराब कामगिरी करत असलेला आझम खान या संघात नसेल. आझम खान लठ्ठपणा आण फिटनेसमुळे सातत्याने ट्रोल होत आहे. सराव सत्रातही त्याने भाग घेतला नव्हता.

पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन म्हणाले की इमाद वसीम भारताविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने आम्ही निराश झालो आहोत. आता नवी स्ट्रॅटेजी राबवण्यात येणार आहे. त्यानुसार आझम खान संघात नसेल. मात्र तो संघाचा हिस्सा राहिल. फिल्डिंगमध्ये त्याने चुका केल्या तसेच फलंदाजीतही त्याला विशेष काही करता आले नाही. अशा परिस्थितीत संघातून त्याला वगळण्याचे संकेत कर्स्टन यांनी दिले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img