19.7 C
New York

Ajit Pawar : अजित पवारांचे आमदार शरद पवारांकडे परत जाणार?

Published:

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर अजितदादा गटात अधिक चुळबुळ उडाली आहे. राज्यात अजितदादा नव्हे तर शरद पवार यांचाच सिक्का चालत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अजितदादा गटाच्या आमदारांना टेन्शन आलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) मधील अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. त्यावर सिन्नर (Sinnar) मधील आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यासारखे करंटे आम्हीच असू जर अजित पवार (Ajit Pawar Group) यांना सोडून गेलो तर असं माणिकराव कोकाटे म्हणाले. एकही आमदार अजित पवार यांना सोडून जाणार नाही, तसं आम्ही परवाच्या बैठकीत बोलूनही दाखवलं, रोहित पवार यांचं वक्तव्य म्हणजे, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले आहेत. आम्ही अजितदादांना सोडून कुठेच जाणार नाही, अशी शपथच या आमदारांनी घेतल्याची माहितीसमोर आली आहे.

Ajit Pawar मुश्रीफ यांनीही या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं

अजितदादा गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. काल आमदारांची बैठक झाली. या बैठकीत सर्वच आमदारांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे बोलताना म्हणाले की, “अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू, एकही आमदार अजित पवार यांना सोडून जाणार नाही, अजितदादा यांना सोडून जाण्यासाठी एक तरी कारण पाहिजे, या काळात आम्ही जर अजित दादांना सोडलं, तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू.”

Ajit Pawar लवकर पक्षप्रवेश करून घ्या

आता दिवसपण थोडे राहिले आहेत रोहित पवारांना सांगा त्यांच्या संपर्कात कुणी असेल तर लवकर पक्षात घ्या, उमेदवार शोधण्याची वेळ त्यांना येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. वेगवेगळ्या कारणाने आमदार कालच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ईडीचा प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा

Ajit Pawar जातीपातीचं राजकारण झालं

या वेळच्या लोकसभेच्या निवडणुकीत फार बदल झाला होता. जातीपातीचे राजकारण आणि संविधानाबद्दल विरोधकांनी अपप्रचार केला. ओबीसी, आदिवासी, मुस्लिम समाज दूर केल्याने त्याचा आम्हाला फटका बसला, फटका बसला, असा दावा सुनील शेळके यांनी केला आहे.

Ajit Pawar अजित पवारांचे आमदार शरद पवारांकडे परत जाणार?

बारामतीत यंदा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगला. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव झाला. बारामती लोकसभेचा निकाल फारच धक्कादायक होता, अशी अजित पवारांनी प्रतिक्रिया खुद्द दिली. अशातच अजित पवार गटातील काही आमदारांनी सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर सुळेंना शुभेच्छा संदेश पाठवल्याचा दारा राष्ट्रवादीकडून करण्यात आला. अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधायचा प्रयत्न अजित दादांच्या आमदारांकडून करण्यात आल्याचंही शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं. तेव्हापासूनच अजित पवारांचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

Ajit Pawar दादांच्यामागे ठाम राहू

दरम्यान, सुनील शेळके अजितदादा गटाचे आमदार यांनीही कालच्या बैठकीची माहिती दिली. कोणतीही परिस्थिती आली तरी अजितदादांना सोडून जाणार नाही, असा शब्द प्रत्येक आमदारांनी अजित पवार यांना दिला आहे. प्रत्येक आमदार अजितदादांच्या पाठी ठामपणे उभं राहण्यावर ठाम आहे, असं सुनील शेळके यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img