Trupti Dimri: अभिनेत्री तृप्ती डिमरीला (Trupti Dimri) सध्या लॉटरीचं लॉटरी लागत चालली आहे. तृप्ती डिमरीने चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. तृप्तीला खरी ओळख मिळाली ती म्हणजे अॅनिमल (Animal) चित्रपटातून. पण आज तृप्ती डिमरी कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. नुकतंच तृप्ती डिमरीने मुंबईमध्ये मोठी संपत्ती खरेदी केली आहे. म्हणजेच आता तृप्ती डिमरीला मुंबईकर बोलायला हरकत नाही. तृप्तीचं नशीब एकदम फळफळलं आहे. अॅनिमल चित्रपट केल्यापासून तृप्ती डिमरीकडे चित्रपटांच्या ऑफर्स लागल्या आहेत.
Trupti Dimri: मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती डिमरीने कार्टर रोडला (Carter Road) मुंबई येथे ग्राऊंड प्लस दोन मजल्यांचा बांगला (Bunglow) खरेदी केला. २,२२६ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला हा बंगला आहे आणि त्याच बिल्ट-अप क्षेत्र 2,194 स्क्वेअर फूट एवढं आहे. आलिशान १४ कोटी रुपयांच्या बंगल्यावर अभिनेत्रीने ७० लाख अशी रक्कम स्टॅम्प ड्युटीसाठी भरली आहे. याशिवाय ३० हजार रुपये अभिनेत्रीने नोंदणी शुल्क देखील दिले आहेत. ३ जून रोजी अभिनेत्रीने नोंदणी केली होती. विशेष म्हणजे तृप्तीच्या नवीन घराच्या बाजूला आसपास अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. सलमान खान, रणबीर कपूर, रेखा, आलिया भट्ट यांचंही घर तिच्या आसपासचं आहे.
तृप्ती डिमरी सध्या ‘भूलभूलैय्या 2’च्या (Bhool Bhoolaiya 2) शूट मध्ये व्यस्त आहे. शिवाय कार्तिक आर्यनसोबत तृप्ती अजून एका चित्रपटात झळकणार आहे. तसंच विकी कौशलसोबतचा तिचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे राजकुमार रावसोबतचा चित्रपट रांगेत आहे. २०१७ साली तृप्ती डिमरीने करिअरला सुरुवात केली. ‘लैला मजनू’,’बुलबुल’,’कला’, ‘मॉम अशा अनेक चित्रपटात तृप्तीने काम केलं आणि हे चित्रपट हिटही ठरले आहेत. पण तृप्ती डिमरीला खरी लोकप्रियता ‘अॅनिमल’ (Animal) चित्रपटामुळे मिळाली.