26.6 C
New York

Lok Sabha : महाराष्ट्रातून लोकसभेत सात महिला खासदार

Published:

लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha) निकाल अखेर मंगळवारी लागला आहे. या निवडणुकीत अनेक महिला खासदारांनी विजय मिळवला आहे. तर महाराष्ट्रातील 7 महिला खासदारांचा विजय झाला आहे. या महिला खासदार नेमक्या कोण आहेत? त्यांनी कोणत्या उमेदवाराला पाडलं? आणि किती मताधिक्याने त्या जिंकल्या आहेत? हे जाणून घेऊयात. यंदा म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणूकीत सत्तारूढ महायुती व विरोधी महाविकास आघाडी यांनी एकूण 17 महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यात एकूण 14 निवडून आलेल्या खासदारांमध्ये चार महिला खासदार निवडून आलेल्या आहेत.

सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदार संघात यंदा पवार विरूद्ध पवार लढत होती. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये ही लढत होत असल्याने, निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. 7 लाख 32 हजार 312 मतं सुप्रिया सुळे यांना पडली आहेत, तर 5 लाख 73 हजार 979 मते सुनेत्रा पवार यांना मिळाली होती.

शोभा बच्छाव

धुळे लोकसभा मतदार संघातून दोन वेळ खासदार राहिलेले भाजप उमेदवार सुभाष भामरे यांचा काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी पराभव केला. 5 लाख 83 हजार 866 मतं शोभा बच्छाव यांना पडली होती. तर 5 लाख 80 हजार 35 मतं सुभाष भामरे यांना पडली होती. शोभा बच्छाव यांनी 3831 मतांनी भामरे यांचा पराभव केला.

प्रतिभा धानोरकर

भाजपचे सिनिअर लीडर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुर लोकसभा मतदार संघात 4 लाख 58 हजार मतं मिळाली होती. तर 7 लाख 18 हजार 410 मतंकाँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना पडली होती. त्यामुळे मुनगंटीवार सारख्या तगड्या उमेदवाराचा पराभव 2 लाख 60 हजार 406 मतांनी धानोरकर प्रतिभा धानोरकर यांनी केला होता.

जरांगे पाटील आमरण उपोषणाच्या निर्णयावर ठाम

स्मिता वाघ

जळगाव लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील यांचा पराभव भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी केला. 6 लाख 74 हजार 428 मतं स्मिता वाघ यांना पडली होती. तर 4 लाख 22 हजार 834 मतं करण पाटील यांना मिळाली होती. त्यामुळे करण पाटील यांचा पराभव 2 लाख 51 हजार 594 मतांनीझाला.

वर्षा गायकवाड

भाजप उमेदवार सरकारी वकील उज्वल निकम यांचा पराभव काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड यांनी केला. 4 लाख 45 हजार 545 मतं वर्षा गायकवाड यांना पडली होती. 4 लाख 29 हजार 31 मतं निकम यांना मिळाली होती. त्यामुळे 16 हजार 514 मतांनी वर्षा गायकवाड यांनी निकम यांचा पराभव केला.

रक्षा खडसे

भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघात 6 लाख 30 हजार 879 मतं पडली होती. तर 3 लाख 58 हजार 696 मतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना पडली होती. त्यामुळे 2 लाख 72 हजार 183 मतांनी रक्षा खडसे यांनी विजय मिळवला. इतकचं नाही तर रक्षा खडसे यांनी खासदारकीची हँट्ट्रीक साधली.

प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवार भाजप उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला. 6 लाख 20 हजार 225 मते प्रणिती शिंदे यांना पडली होती. तर 5 लाख 46 हजार 28 मते राम सातपुते यांना पडली आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी 74 हजार 197 मतांनी सातपुते यांचा पराभव केला. दरम्याम 18 व्या लोकसभा निवडणुकीत फक्त 30 किंवा 30 पेक्षा जास्त महिला उमेदवार विजयी घोषित झाल्या आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकीत हीच संख्या 78 होती. गेल्या टर्मपेक्षा यंदा कमी महिला खासदार जिंकून आल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img