8.7 C
New York

Ind Vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट

Published:

टी20 विश्वचषक 2024 मध्ये 9 जून रोजी भारत-पाकिस्तान (Ind Vs Pak) सामना रंगणार आहे. या सामन्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्रत्येकाला या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मात्र, या सामन्यापूर्वी एक वाईट बातमी आहे.सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष आता रविवारी होणाऱ्या भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यावर आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. दरम्यान चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहयतायत त्यावर संकट येण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी केवळ एक दिवस बाकी असून या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जातंय. न्यू यॉर्कमध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच 9 जूनला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे.

Ind Vs Pak भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट

T20 वर्ल्डकप 2024 चा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार, हा सामना सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. पण भारतात हा सामना संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. मात्र AQ Weather च्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमध्ये रात्री 11 वाजता म्हणजेच भारतात रात्री 8:30 वाजता पावसाची शक्यता आहे. यावेळी ही पावसाची शक्यता 51 टक्के असल्याची वर्तवण्यात आली आहे. म्हणजे सामनाच्या दिवशी पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी खेळ होणार नाही. जर सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांनं 1-1 गुण वाटून दिले जातील. असं झाल्यास पाकिस्तानला नुकसान सहन करावं लागू शकते.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी वाढलं टीम इंडियाचे टेन्शन

Ind Vs Pak दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाचा सामना

9 जून रोजी होणारा हा सामना भारत आणि पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयरलँडचा पराभव करून दोन गुण मिळवले आहेत. तर पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाला पाकिस्तानला पराभूत करून लवकरात लवकर सुपर 8 मध्ये आपले स्थान निश्चित करायचंय. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img