Kangana Ranaut: दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranaut) लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Nivadnuk 2024) जिंकल्यानंतर संसदेत पोहोचली आहे. एनडीएची (NDA) संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक होण्याच्या आधी संसदेच्या बाहेर कंगनाची भेट चिराग पासवान (Chirag Paswan) याच्यासोबत झाली.
Kangana Ranaut: यंदाच्या लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये अनेक सेलिब्रिटींना पसंती मिळाली. यंदाच्या संसदेत नव नवे चेहरेदेखील पाहायला मिळाले. त्यापैकीच एका चेहऱ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. लोक जनशक्ती पार्टीचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष आणि खासदार असलेले चिराग पासवान २०२४च्या लोकसभा निवडणुकीमुळे फार चर्चेत आले आहेत. सर्वत्र त्यांचा लूक आणि त्यांच्या स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशातच सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असून ते नॅशनल क्रॅश झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर सर्वत्र कंगना रणौत आणि चिराग पासवान यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एनडीए ची बैठक नुकतीच पार पडली. चिराग पासवान हे एनडीएच्या बैठकीसाठी आले असताना माध्यमांसमोर पोझ देत असतात. त्याचवेळी तिथून कंगना जात असते. कंगनाला पाहून चिराग पासवान आवाज देतात आणि तिला बोलवून घेऊन गळाभेट करून जिंकल्याबद्धल अभिनंदन करतात. केंदीय मंत्री राहिलेले दिवंगत रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी एनडीएचा एक मोठा भाग आहे. चिराग हे बिहारच्या (Bihar) हाजीपूर (Hajipur) मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार बनलेले लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आहेत. चिराग यांनी सुद्धा एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेता निवडीच्या बैठकीला हजेरी लावली होती.
चिराग पासवानने त्यांचं नशीब राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी अभिनयक्षेत्रात आजमावलं होत. २०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिले ना मिले हम’ (Miley Na Miley Hum) या चित्रपटातून चिरागने बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं होतं. ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटात कंगनाने चिरागच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यांनतर चिरागसुद्धा अभिनयक्षेत्रात फार काही कामगिरी करू शकले नाहीत. चिराग यांनी २०१४ मध्ये आपल्या वडिलांचा राजकीय वारसा सांभाळायला घेतल्यानंतर त्यांचं राजकारणातील करिअर मात्र एकदम सुपरहिट चालत होत.
http://CISF च्या महिला जवानने कंगनाचा कानशिलात लगावली
तर दुसरीकडे बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. कंगनाचा ‘क्वीन’ (Queen) हा चित्रपट तिच्या अभिनयामुळे जबरदस्त गाजला होता. त्यामुळेच कंगना बॉलीवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाऊ लागली. कंगना निवडणुकीच्या आधीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्थक राहिली आहे. अखेर यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी कंगनाने भाजपात प्रवेश केला आणि आणि मंडी मतदारसंघातून ‘क्वीन’ने निवडणूक लढवली. मंडी (Mandi) मतदारसंघातून कंगना रणौतची निवड झाली आणि पहिल्याच केलेल्या प्रयत्नात कंगनाचा विजय झाला आहे.