7.3 C
New York

Manoj Jarange : जरांगे पाटील आमरण उपोषणाच्या निर्णयावर ठाम

Published:

राज्यातील मराठा समाजाला सगेसोयरे व्याख्येत बसणारे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे शनिवारपासून पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आमरण उपोषण करणे टाळले होते. मात्र, ही आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी 4 जूनपासून पु्न्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते. तारीख बदलून मात्र, नंतर ही 8 जून करण्यात आली होती. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलिसांनी (Jalna Police) मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली होती.

Manoj Jarange परंतु, मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत.

मनोज जरांगे आता आमरण उपोषणाला पोलिसांच्या परवानगीशिवाय सुरुवात करणार आहेत. आज सकाळी दहा वाजता सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसतील. यानंतर आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांना यापूर्वी उपोषणस्थळावरुन रुग्णालयात नेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले होते. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले होते. तेव्हापासून खऱ्या अर्थाने मनोज जरांगे हे प्रकाशझोतात आले होते आणि आंतरवाली सराटी (antarwali sarati ) येथील त्यांचे आमरण उपोषण मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation agitation) केंद्र झाले होते. हा अनुभव लक्षात घेता पोलीस आता मनोज जरांगे यांच्याविरुद्ध काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘या’ भाजप नेत्याचा घरचा आहेर

Manoj Jarange परभणीचे खासदार बंडू जाधव मनोज जरांगेच्या भेटीला

बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्यानंतर परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी शुक्रवारी रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांचा सत्कारही केला.रात्री उशिरा अंतरवाली सराटी गावात ही भेट झाली.

Manoj Jarange मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांचा विरोध

जालन्यातली आंतरवाली सराटी हे गेल्या काही महिन्यांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला होता. मात्र, आंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनीच अलीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला विरोध केला होता. आंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच आजूबाजूच्या गावातील दिलेल्या निवेदनावरून प्रशासनाने जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. याशिवाय, उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणावर ठाम आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img