21 C
New York

IND vs PAK : टीम इंडिया जोर लगाके…

Published:

– सुभाष हरचेकर

क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचा (IND vs PAK) संघ पुन्हा एकदा एकमेकाला भिडताना दिसतील. आयसीसी टिवेन्टी २० विश्वचषक स्पर्धेचा एकोणीसावा सामना कर्णधार रोहित शर्माचा भारतीय संघ आणि कर्णधार बाबर आझमच्या पाकिस्तान संघांमध्ये खेळला जाईल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला पाकिस्तानला पराभवाचा धक्का देणे गरजेचे आहे. भारतीय संघ असलेल्या अ गटात अमेरीका, आयर्लंड ,कॅनडा आणि पाकिस्तान हे संघ आहेत. अमेरीकेने पाकिस्तानचा सुपर ओवरमध्ये पराभव करून दोन विजयांसह चार गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात आयर्लंड विरूद्ध विजय मिळवला असून पाकिस्तानवर विजय मिळवला तर उपांत्य फेरी गाठण्यात रोहित शर्माच्या संघाला अडचण येऊ नये.

२००९ साली टिवेन्टी २० विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यामुळे मोठेच दडपण आले असणार. या स्पर्धेतील आव्हान जिवंत राहण्यासाठी पाकिस्तानला सामना जिंकणे खूपच गरजेचे आहे. न्यूयॉर्कमधील नासॉ कौंटी इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीने मात्र ज्या संघांचे सामने येथे आहेत त्यांची झोप उडवली आहे. येथील खेळपट्टीवर चेंडू अनपेक्षितपणे उसळी घेत असून आयर्लंडचा फलंदाज आणि रोहित शर्माला दुखापतही झाली आहे. अनेक खेळाडूनी या खेळपट्टीबाबत तक्रारी केल्या आहेत. दक्षिण आफ्रीकेने श्रीलंकेला ७७ धावांत गुंडाळले होते तर भारतीय गोलंदाजानी आयर्लंडला ९७ धावांवर रोखले होते. सामने सकाळी सुरू होत असल्यामुळे हवामानाचा परिणाम प्रथम् फलंदाजी करणाऱ्या संघावर होतो. रविवारच्या सामन्यात नाणेफेक खूपच महत्वाची ठरणार आहे. भारतीय संघाला मात्र जोर लगाके हैया असे म्हणत पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरावे लागेल. आयसीसी टिवेन्टी २० विश्वचषक स्पर्धेत उभय संघांमध्ये सात सामने झाले असून यापैकी भारतीय संघाने सहा जिंकले असून एकमेव सामना पाकिस्तानने २०२१ साली जिंकला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img