-1.6 C
New York

Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक ‘रामोजी राव’ यांचे निधन

Published:

सुप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ईटीव्ही नेटवर्कचे प्रमुख रामोजी राव (Ramoji Rao) यांचे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार जी किशन रेड्डी यांनी ट्विट करुन राव यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आणि दुःखही व्यक्त केले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनीही राव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

Ramoji Rao रामोजी राव यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग

चेरुकुरी रामोजी राव यांना तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये रामोजी राव यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. त्यांना एक प्रसिद्ध भारतीय उद्योगपती, सर्वात जुने आणि ज्येष्ठ माध्यम उद्योजक आणि चित्रपट निर्माता म्हणून ओळखले जाते. रामोजी राव यांनी 1995 साली माध्यम क्षेत्रातील सर्वात जुन्या असलेल्या ई टीव्ही नेटवर्कची स्थापना केली होती. ईनाडू वृत्तपत्र आणि ईटीव्ही ही त्यांची प्रमुख माध्यमे होती. ई टीव्हीच्या माध्यमातून भारतातील जवळपास सर्वच प्रमुख प्रादेशिक भाषेतील वृत्तवाहिन्या त्यांनी सुरु केल्या होत्या.

‘या’ भाजप नेत्याचा घरचा आहेर

राव देशातील अनेक राज्यात वृत्तवाहिन्यांसाठीचे पत्रकार तयार केले. आजच्या काळातील सर्वच न्युज चॅनेलमध्ये असलेले प्रमुख पत्रकार हे मूळ ई टीव्हीचे आहेत. 1996 साली राव यांनी मोठी चित्रपटीसाठी जगातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक सुविधांयुक्त अशा रामोजी फिल्म सिटीची स्थापना केली होती. उषा किरण मुव्हीज या चित्रपट निर्मिती कंपनीद्वारे रामोजी राव यांनी तेलगु भाषेतील चित्रपटांमध्ये मोठे योगदान दिले. त्यांच्या या कामासाठी त्यांना अनेक नॅशनल आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय मार्गदर्शक चिटफंड, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्सचेही ते प्रमुख आहेत.

रामोजी राव हे काही वर्षांपूर्वी कॅन्सरवर मात करुन पूर्णपणे बरे झाले होते. मात्र काही दिवसांपासून त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले होते. नुकतेच त्यांना हैदराबादमधील नानाक्रमगुडा येथील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. माध्यमांमधील माहितीनुसार, त्यांचे ब्लड प्रेशर वाढले होते, त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. या दरम्यान, कृत्रिम श्वसनयंत्रणेद्वारे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडतच चालली होती. अखेरीस शनिवारी पहाटे चार वाजून 50 मिनिटांनी त्यांची प्राणज्योती मालवली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img