3.8 C
New York

Shrikant Shinde : लोकसभा गट नेतेपदी श्रीकांत शिंदेंची निवड

Published:

नवी दिल्ली

एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (Shiv Sena) लोकसभा गट नेतेपदी कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॅा. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची एकमताने निवड करण्यात आलीय. तर तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Srirang Barne) हे पक्षाचे संसदेतील प्रतोद असतील. आज झालेल्या शिवसेना संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवसेना लोकसभा गटनेता निवडीसाठी संसदीय समिती सदस्य खासदार श्रीरंग बारणे यांनी डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला बुलडाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी अनुमोदन दिले. शिवसेना संसदीय समितीची बैठक संसद भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व शिवसेना खासदारांनी एकमताने गट नेते पदी खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांची निवड केली.

शिवसेना लोकसभा गट नेता निवड प्रक्रिया ही शिवसेना पक्षांतर्गत करण्यात आली आहे. लोकसभा सभापती यांची निवड झाल्यानंतर शिवसेना लोकसभा गट नेते पदाची अधिकृत निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img