19.7 C
New York

Rahat Fateh Ali Khan Bado Badi: राहत फतेह अली खान यांना अश्रू अनावर; कारण आलं समोर

Published:

Rahat Fateh Ali Khan Bado Badi : पाकिस्तानी सुप्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali khan) यांच्या ‘बदो बदी’ (Bado Badi) या गाण्याविरोधात युट्युबने (YuoTube) कठोर कारवाई केली आहे. युट्युब ने गाणं डिलिट केल्यामुळे राहत फतेह अली खान ढसाढसा रडले आहेत.

Rahat Fateh Ali Khan Bado Badi: पाकिस्तानचे गायक राहत फतेह अली खान यांच्या ‘बदो बदी’ या गाण्याविरोधात युट्युबने कठोर कारवाई केली आहे. यूट्यूबने हे गाणं आपल्या प्लॅटफॉर्मवरून उडवून टाकलं आहे. राहत फतेह अली खान यांच्या ‘बदो बदी’ या गाण्याला यूट्यूबवर २८ मिलियन (28 Milion) पेक्षा जास्त व्ह्यूज (Views) असून हे गाणं यूट्यूबने डिलीट केल्यामुळे राहत फतेह अली खान यांना अश्रू अनावर झाले आहेत. राहत फतेह अली खान ढसाढसा रडत असून त्यांचा फोटो व्हायरल होत आहे. हे गाणं सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होतंय आणि या गाण्यावर रील्सचा धुमाकूळ सुरु आहे.

युट्युबने का डिलीट केलं गाणं ?
मिळालेल्या माहितीनुसार, राहत फतेह अली खान यांच्या ‘बदो बदी’ या गाण्याने कॉपीराइटचे उल्लंघन केले अशी तक्रार यूट्यूबकडे आली होती. अशातच यूट्यूबने या सगळ्याची पडताळणी करत राहत फतेह अली खान यांच्या चॅनलला कॉपीराईट स्ट्राइक पाठवून हे गाणं डिलीट केलं.

कॉपीराईट स्ट्राइक कशामुळे आले?
‘बदो बदी’ या गाण्याचे बोल नूरजहाँच्या 1973 मध्ये आलेल्या ‘बनारसी ठग’ चित्रपटातील गाण्यासारखेच असल्यामुळे युट्युबने कॉपीराइटचे नियम लक्षात घेऊन राहत फतेह अली खान यांच यूट्यूबला तुफान व्हायरल असलेलं ‘बदो बदी’ हे गाणं आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवून टाकलं.

CISF च्या महिला जवानने कंगनाचा कानशिलात लगावली ताज्या बातम्यामनोरंजन

‘बदो बदी’ (Bado Badi) या गाण्याबद्धल सांगायचं झालं तर, या गाण्यामध्ये राहत फतेह अली खान यांच्यासोबत एक मॉडेल सुद्धा दिसून आली त्या मॉडेलचं नाव वजदान राव (Wajdan Rao) असं आहे. या गाण्यानंतर राहत फतेह अली खान यांची टिंगल उडवण्यात आली. ‘बदो बदी’ या गाण्याच्या राहत फतेह अली खान आणि वाजदान राव यांच्या अनेक मिम्स बनवण्यात आल्या आणि त्या व्हायरल व्हायला लागल्या. या गाण्यासाठी राहत आणि वाजदान यांना खूप ट्रोल करण्यात आलं. या गाण्यांवर भारत-पाकिस्तानमधल्या अनेक सेलेब्सने रील्स बनवल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img