मुंबई
पवई (Powai) जय भीम नगर दगडफेक प्रकरणी पोलिसांनी 51 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी 200 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पवई जय भीम नगर झोपडपट्टी अतिक्रमण काढण्यासाठी गुरुवारी मुंबई महानगरपालिकेची टीम (BMC) पोलिसांसोबत (Mumbai Police) गेली होती. या कारवाईदरम्यान झोपडीधारकांनी (Powai Stone Pelting) पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत 25 पेक्षा अधिक पोलीस आणि पालिका कर्मचारी जखमी झाले.
पवईतील जय भीम नगर परिसरामधील बेकायदा झोपडपट्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या आणि पोलिसांच्यावर दगडफेक करण्यात आल्याची घटना आज घडली आहे. यामध्ये अतिक्रमणविरोधी पथकावर स्थानिकांनी केलेल्या दगडफेकी मध्ये 6 ते 8 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांच्या कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पवईतल्या जय भीम नगर परिसरामध्ये पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे. अतिक्रमण कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यावेळी नागरिकांनी झोपडपट्टी वाचवण्यासाठी आंदोलन केले. अतिक्रमण काढत असताना संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक केली. अतिक्रमण विरोधी पथकावर स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये 6 ते 8 पोलिस जखमी झाले आहेत.