3.5 C
New York

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड

Published:

नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) निकाल 2024 मध्ये NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. पंतप्राधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची NDA च्या नेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीला राजनाथ सिंह यांनी प्रस्ताव मांडला. अमित शाह यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलं.

नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ येत्या 9 जून रोजी घेणार आहेत. 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता हा शपधविधी होत आहे. दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्याला गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार यांनी अनुमोदन केलं.

रम्यान, दुपारी बाराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेंट्रल हॉलमध्ये एन्ट्री झाली. त्यांचं स्वागत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं. मोदींच्या एन्ट्रीवेळी सेंट्रल हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘स्वागत है भाई स्वागत है’ अशा घोषणा देत मोदींचं स्वागत करण्यात आलं. यावेळी सर्व खासदारांनी उभं राहून, टाळ्यांचा कडकडाट करुन मोदींचं स्वागत केलं. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img