23.1 C
New York

Mumbai Metro : मुंबई मेट्रोचा विक्रम, 24 तासात तब्बल इतक्या लाख प्रवाशांनी केला प्रवास

Published:

मुंबई

दहिसर आणि गुंदवली (अंधेरी पूर्व) दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो (Mumbai Metro) 2 आणि 7 लाईनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. यानंतर या मालिकेवर एकाच महिन्यात 44.26 ला प्रवासाने प्रवास केल्याचे करण्यात आले होते. तर पहिल्या आठवड्यात या मेट्रोतून 1.40 प्रवाशांनी प्रवास केला होता. आता या लाईनवरील मेट्रोने पुन्हा एक विक्रम नोंदवला आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 2 लाख 60 हजार 471 प्रवाशांनी प्रवास केला आहे. अंधेरी पूर्व गुंदवली ते अंधेरी पश्चिम नगर दरम्यान मेट्रो दोन आणि मेट्रो सात सेवा सुरू आहे.

मेट्रो 2 आणि 7 ने नवा विक्रम रचला असून मार्गिका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या एका दिवसात सर्वाधिक प्रवासी वाहतूक झाली आहे. गुरुवारी एका दिवसात तब्बल २ लाख ६० हजार ४७१ प्रवाशांनी प्रवास केला. मुंबईकर प्रवाशांची मेट्रो प्रवासाला पसंती मिळताना दिसून येत आहे. अंधेरी पूर्व गुंदवली ते अंधेरी पश्चिम नगर दरम्यान मेट्रो दोन आणि मेट्रो सात सेवा सुरू आहे.

रायडरशिप डेटानुसार, मेट्रो लाईन्स 2 आणि 7 या दोन्ही मार्गांवर दररोज सरासरी प्रवाशांची संख्या जवळपास 1.47 लाख आहे. तसेच या मार्गावर प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत आहे. धनुकरवाडी स्थानकातून सकाळी 5.25 वाजता मेट्रो सेवा सुरू होते आणि शेवटची ट्रेन दहिसर पूर्वेकडून रात्री 11.11 वाजता सुटते.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो लाईन 7 वरील गुंदवली आणि मागाठाणे आणि मेट्रो लाईन 2A वरील अंधेरी पश्चिम, दहिसर पूर्व आणि आनंद नगर येथे इतर स्थानकांच्या तुलनेत सर्वाधिक प्रवासी संख्या वाढली आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीने बांधलेल्या एलिव्हेटेड मेट्रो लाईन 2A आणि 7 ने वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वरील वाहनांची रहदारी 25 टक्क्यांनी कमी करणे आणि ट्रेनचा भार 15 टक्क्यांनी कमी करणे हा या मेट्रो सुरु करण्यामागचा उद्देश होता. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणखी कमी होईल.

एकूण 17 स्थानकांचा समावेश असलेल्या मेट्रो लाईन 2A चा प्रवास वेळ 40 मिनिटे इतका आहे तर 13 स्थानके असलेल्या लाईन 7 साठी प्रवास वेळ 35 मिनिटे इतका आहे. सध्या मेट्रो 70 किमी प्रतितास वेगाने धावते. 2 मेट्रो कॉरिडॉरवर पीक हवरमध्ये आठ मिनिटांच्या अंतराने आणि कमी वेळेत 10 मिनिटांच्या अंतराने मेट्रो सेवा सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img