23.1 C
New York

Raj Thackeray : कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार

Published:

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी (Konkan Graduate Constituency) समोर आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे अभिजीत पानसे आता उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची (Raj Thackeray) भेट घेतली होती. यानंतर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निर्णयाची माहिती दिली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन आम्ही माघार घेत आहोत असे सरदेसाई यावेळी म्हणाले.

मनसेने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता भाजपसाठी ही निवडणूक सोपी झाली आहे. या निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना सरदेसाई म्हणाले, दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत फडणवीसांनी विनंती केली. त्यांच्या या विनंतीला मान देऊन कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मनसे लढणार नसल्याचे निश्चित करण्यात आले. या निर्णयानुसार आता अभिजीत पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत.

‘मराठा आरक्षणाचा फटका बसला’ अजित पवारांची कबुली

कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेला मानणारा पदवीधर वर्ग मोठा आहे. जर या मतदारसंघात मनसेने उमेदवार दिला असता तर भाजपाच्या मतांवर त्याचा निश्चित परिणाम झाला असता. त्यामुळे भाजपाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. देवेंद्र फडणवीसांनी सूत्रे हाती घेतली आणि राज ठाकरेंना विनंती केली. त्यांच्या या विनंतीचा मनसेनेही विचार करत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img