3.7 C
New York

Monsoon Update : आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

Published:

राज्यात मान्सून दाखल होताच हवामान पूर्ण बदललं आहे. हवामान विभागाने (Pune Rain) दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात कालपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळीच नगर आणि पुणे शहरात हजेरी (Monsoon Update) लावली आहे. सकाळीच ढगांच्या गर्दीने अंधारल्यासारखी परिस्थिती झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. फक्त नंदूरबार जिल्ह्यात हवामान कोरडे राहिल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसात मान्सून मुंबईसह विदर्भात धडक देईल. आगामी पाच दिवसात जिल्हा पातळीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे.

आज कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यांत आज पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या व्यतिरिक्त अन्य काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता दिसून येत आहे. मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार अशी चर्चा होती. आता मात्र नागरिकांना चांगली बातमी मिळाली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाचं आज आगमन झालं. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. त्यामुळे वातावरणात बदल झाला होता. राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान दिसत आहे.

Monsoon Update चिपळूणमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

चिपळूणमध्ये दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उष्णतेमुळे हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत. पहिल्याच पावसात महामार्गावर पाणीच पाणी झाले.

कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार

Monsoon Update सोलापुरात जोरदार पाऊस –

सोलापूरमध्ये मान्सन धडकला असून पावसाने जोरदार बॅटिंग केली. सोलापूर शहरात गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. मागील अनेक दिवसापासून सोलापूरकरांना पावसाची प्रतीक्षा होती, पावसाने बळीराजा सुखावला आहे.

Monsoon Update लातूरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

लातूर शहर आणि परिसरात पावसानं तुफान बॅटिंग केली. विजेच्या कडकडाटासह पाऊसने जोरदार हजेरी लावली. औसा रोड, आंबेजोगाई रोड, बार्शी रोड, नांदेड रोड या भागातील मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत होतं. ढगाच्या गडगडाटासह पडणाऱ्या पावसाने खडक उन्हाळ्यानंतर पावसाचा फील दिला..

Monsoon Update वाशिम –

वाशिमच्या कारंजा तालुक्यात मान्सूनपर्व पाऊस बरसला. त्यामुळे वाशिमकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. हवामान खात्याचा मान्सूनपूर्व पावसाचा अंदाजानुसार कारंजा तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे पाऊस आल्याने शहरात रस्त्याच्या काही भागात नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी वाहताना दिसत होतं.

यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाले आहे. यामुळे राज्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेमल चक्रीवादळाने धडक दिली होती. त्याचा परिणाम म्हणून मान्सूनचा वेग वाढला होता. मान्सून वेगाने बंगालच्या खाडीकडे पोहोचला. साधारणपणे अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाम या राज्यांत मान्सूनचा एन्ट्री 5 जूनपासून होते. परंतु, मान्सूनची सध्याची गती पाहता एक ते दोन दिवस आधीच या भागात मान्सून दाखल झाला. आयएमडीने असा अंदाज व्यक्त होता की दक्षिण अरब समुद्र, लक्षद्वीप आणि बंगालच्या खाडीतील विविध ठिकाणी मान्सून पुढे सरकणार आहे. या दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img