26.6 C
New York

Devendra Fadnavis : शिंदे, फडणवीस, अजितदादांची दिल्लीत बैठक

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) महायुतीला (Mahayuti) अपेक्षित असलेले यश मिळाले नाही आहे. भाजपच्या (BJP) वतीने राज्यात आपकी बार 45 पारचा नारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात महायुतीला 17 जागा मिळाल्या आहे. त्यामुळे या संपूर्ण अपयशाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदाचा राजीनामा देण्याचे निर्णय जाहीर केला होता. आज एनडीएच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात दिल्लीतील वातावरण तापलेले आहे. NDAच्या बैठकीला गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांची दिल्लीत बैठक झाली आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या राजीनामेवर ठाम असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देण्याचे निर्णय जाहीर केल्यानंतर महायुतीतील अनेक नेत्यांनी फडणवीस यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र फडणवीस आपल्या निर्णयावर ठाम आहे. दिल्ली भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या बैठकीपूर्वी राज्यातील घटक पक्षातील नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत फडणवीस यांनी एक तास बैठक घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे फडणवीस आपल्या राजीनामावर काम असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यांमध्ये भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या करिता पक्ष बांधणीसाठी पूर्णपणे पक्षाचे काम करण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून पुन्हा 2014 प्रमाणे धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. तर विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. भाजपच्या राज्यातील फेरबदल झाल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जन आशीर्वाद यात्रा काढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img