3.6 C
New York

Pathardi Bandh: पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट, आज पाथर्डी बंदची हाक

Published:

अहमदनगरच्या (Ahmednaagar News) पाथर्डी (Pathardi Bandh) तालुक्यातील शिरापूर (Shirapur) येथील एका युवकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडे समर्थकांनी याबाबत केली होती. या पार्श्वभूमीवर आज सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डीत बंदची (Pathardi Bandh) हाक देण्यात आली आहे. पंकजा मुंडे समर्थक शिरापूर येथील संबंधित युवकाच्या घरावर जाब विचारण्यासाठी गेल्याचे समजताच पोलिसांनी मोठा फौजफाटा शिरापूर येथे तैनात केला होता. संबंधित घटना पाथर्डी पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेत आचारसंहिता भंग आणि स्टेटस ठेवून सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे.

Pathardi Bandh परळीतील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

भाजपच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्या बद्दल निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

Pathardi Bandh वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यावर पोलीस कारवाई करणाऱ्यांवर कारवाई

गणेशपार भागातील गणेश हरिभाऊ सावंत या युवकाने फेसबुकवर निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केली.यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलिसांनी चौकशी करत या युवकावर गुन्हा दाखल करून तात्काळ ताब्यात घेतले. मतदानापासूनच बीड जिल्ह्यातील सोशल मीडियावर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले होते मात्र मतमोजणीनंतर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यावर पोलीस कारवाई करत आहेत.

Pathardi Bandh नेमकं काय घडले?

मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला. परळीमध्ये 74 हजार 834 मतांची आघाडी पंकजा मुंडे यांना मिळाली. बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानले जाते, या मतदारसंघा धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होत. बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. अत्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत निकाल जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केली.. आरोपीने फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडीओ पोस्ट केला. तसेच व्हिडीओखाली आक्षेपार्ह पोस्ट देखील केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img