19.7 C
New York

Ajit Pawar : अजितदादांनी सांगितलं महायुतीच्या पराभवाचं कारण

Published:

बारामती जिंकण्यासाठी जंग जंग पछाडल्यानंतरही महायुतीला बारामती काही जिंकता आली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वतः अजित पवार Ajit Pawar इतकंच काय तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीत येऊन प्रचार केला. तरीही सुप्रिया सुळेंना विजयी होण्यापासून रोखू शकले नाहीत. आता महायुतीत या पराभवावर चिंतन सुरू झालं आहे. अजितदादांनाही सुप्रिया सुळेंचं यश चकीत करून गेलंय. काल प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात अजित पवार यांनी अशीच प्रतिक्रिया दिली.

बारामती मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार म्हणाले, बारामतीचा जो निकाल लागलाय त्यामुळे मी स्वतः आश्चर्यचकीत झालोय. मी पहिल्यांदा येथून 1991 मध्ये खासदार झालो होतो. तेव्हापासून कोणत्याही निवडणुका झाल्या तरी बारामतीकरांनी मला प्रचंड पाठिंबा दिला होता. परंतु, यावेळी निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यात महायुतीच्या उमेदवारांना मराठा आरक्षण, विरोधकांनी केलेला संविधान बदलाचा प्रचाराचा फटका बसला. तसेच मुस्लिम समाजही आमच्यापासून दूर गेला. बारामतीमधील पराभव आम्ही मान्य करतो. या ठिकाणी मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे अशी कबुली अजित पवार यांनी दिली. राज्यात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका आम्ही अधिक ताकदीने लढू असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

शिंदेंकडून संसदेत शेरेबाजी; मोदीही भारावले

निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत अशा वावड्या उठू लागल्या आहेत. यावरही अजित पवार यांनी भाष्य केले. आमच्या पक्षातील कोणताही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नाही असे अजितदादांनी स्पष्टपणे सांगून टाकले. त्यांच्या या वक्तव्यानंतरही या चर्चा थांबलेल्या नाहीत त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह देशाचं लक्ष बारामती मतदारसंघावर होतं. कारण येथे पवार कुटुंबातील सदस्य रिंगणात होते. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या. त्यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. बारामतीत जंगी सभा झाली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हजर होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सभा घेतली. पण, या कशाचाच उपयोग झाला नाही. शरद पवारांचंच नाव येथे चाललं. सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img